Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RahulGandhiNewsUpdate : अखेर राहुल गांधी यांच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल , हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी शक्तीचा वापर केल्याचा आरोप !!

Spread the love

नवी दिल्ली : आज दुसऱ्या दिवशी पुन्हा डॉ . बाबासाहेब आंबेडकरांवर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या अमित शहांच्या विरोधात काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी हातात बाबासाहेबांच्या फोटोचे फलक घेत संसद परिसरात जय भीम च्या घोषणांनी आंदोलन केले. दरम्यान हे आंदोलन चालू असताना राहुल गांधी आणि विरोधी खासदार संसदेच्या प्रवेश द्वारातून सनदेत प्रवेश करीत असताना सत्ता पक्षाच्या खासदारांनी त्यांची वाट अडवत जोरदार घोषणाबाजी केली त्यात राहुल गांधींवर आरोप करण्यात आला कि , त्यांनी भाजपच्या खासदारांना धक्काबुक्की केली तेंव्हा दोन खासदार जखमी झाले.

या प्रकरणात भाजप नेत्यांच्या फिर्यादीवरून दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींविरोधात एफआयआर नोंदवला आहे. भाजपच्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. राहुल गांधींनी केलेल्या हाणामारीत त्यांचे दोन खासदार जखमी झाल्याचा आरोप भाजपने केला असून त्यांना आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याशिवाय भाजपच्या अनुसूचित जमातीच्या महिला खासदाराने राहुल यांच्या असभ्य वर्तनाची तक्रार राज्यसभा अध्यक्षांकडे केली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या खासदारांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. भाजपने राहुल गांधींविरोधात खुनाचा प्रयत्न ते भारतीय न्याय संहितेच्या 6 गंभीर कलमांखाली तक्रार दाखल केली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,भारतीय न्याय संहितेच्या पुढील कलमांखाली राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-कलम 115: स्वेच्छेने दुखापत करणे
-कलम 117: गंभीर दुखापत करणे
-कलम 125: जीवन आणि वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे
-कलम 131: गुन्हेगारी शक्तीचा वापर
-कलम 351: गुन्हेगारी धमकी
-कलम 3(5): समान हेतूसाठी कार्य करणे

दरम्यान भाजपने राहुल गांधींविरोधात – कलम 109: हत्येचा प्रयत्न, – कलम 115: स्वेच्छेने दुखापत करणे, – कलम 117: स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे, – कलम 121: सरकारी कर्मचाऱ्याचे त्याच्या कर्तव्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी दुखापत करणे, – कलम 351: गुन्हेगारी धमकी, – कलम 125: इतरांची सुरक्षा धोक्यात आणणे या कलमांखाली तक्रार दिली होती.

कोण आहे खासदार प्रताप चंद्र सारंगी ?

ऑस्ट्रेलियन ख्रिश्चन मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांच्या दोन मुलांना १९९९ मध्ये ओडिशात स्टेशन वॅगनमध्ये झोपलेल्या अवस्थेत जाळून मारण्यात आले होते. अटलबिहारी वाजपेयी तेव्हा पंतप्रधान होते आणि त्या घटनेमुळे भारताची जगभरात छी थू झाली होती. दारा सिंग हा त्या घटनेला मुख्य आरोपी होता आणि तो बजरंग दलाशी संबंधित होता. प्रताप चंद्र सारंगी हे तेव्हा बजरंग दलाचे तिथले प्रमुख होते. हेच सारंगी आज जे राहुल गांधींनी धक्का दिला, असा टीव्हीला बाईट देत देत कपाळावर हात ठेवून व्हील चेअरवरून गेले. आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. सारंगी त्यावेळी स्टेन हत्येमधले एक आरोपी होते ज्यांची नंतर निर्दोष सुटका झाली. जशी सावरकरांची गांधी हत्येच्या आरोपातून झाली होती. ओडिशा विधानसभेवर हल्ला करून दंगल माजवल्याप्रकरणीही सारंगींना अटक झाली होती. तर हे साधूवृत्तीचे गृहस्थ. हेच आज आज राहुल गांधींनी मला धक्का दिला म्हणून कांगावा करीत आहेत.
( ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या फेसबुक वॉल वरून )

आपलं सरकार

Click to listen highlighted text!