Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AccidentNewsUpdate : वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात , ५ ठार , 13 जखमी

Spread the love

रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटाजवळ  एका धोकादायक वळणावर बसला भीषण अपघात झाला आहे. बस दरीत कोसळून पाच जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. तर, 12 ते 13 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. चाकण इथून महाडला लग्नासाठी जात असताना आज सकाळच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. बसमध्ये 40 च्या आसपास प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

ताम्हिणी घाटातील वॉटरफॉल पॉईंटजवळ भीषण अपघात घडल्याची घटना उघडकीस आली आहे. एका प्रवासी ट्रॅव्हल्सचा ताबा सुटल्यानं ती पलटी झाली असून या दुर्घटनेत पाच जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही ट्रॅव्हल्स चाकणवरून वीरवाडीला (महाड), लग्नाला चालली होती. पाच जण जागीच ठार झाले असून तीन महिला आणि दोन पुरूषांचे मृतदेह बाहेर काढल्याची माहिती मिळत आहे. अपघातस्थळी बचावकार्य सुरू असून अनेकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मृतांची संख्या वाढण्याची भितीही व्यक्त केली जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्रॅव्हल्समध्ये अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यात आलं.

पुण्यावरून रायगड दिशेकडे येत असताना तीव्र उतारावर अंदाज न आल्यानं अपघात घडला. अपघातात एकूण 45 प्रवाशी प्रवास करत होते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 25 हून अधिक प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघात स्थळी माणगावमधील रुग्णवाहिकांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रायगडच्या ताम्हिणी घाटात एका खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात बसमधील काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते. पुण्यावरून रायगडच्या दिशेकडे येत असताना ताम्हिणी घाटातील तीव्र वळणावर ही बस कलंडली आणि अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एकूण 45 प्रवासी बसमधून प्रवास करत होते. त्यामधील बरेचसे प्रवासी जखमी असल्याची माहिती मिळतेय. काही प्रवासी बसखाली अडकून पडल्यानं त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!