ParliamentNewsUpdate : संसदेत धक्काबुक्की, भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी; राहुल गांधींनी धक्का मारल्याचा आराेप

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अमित शाह या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला हाेता. यावरुन काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी रान उठवले हाेते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप खासदारांना काँग्रेसवरच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा ठपका ठेवत गुरुवारी संसदेत निषेध आंदाेलन केले. हे आंदाेलन सुरु असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा गंभीर आराेप भाजपचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांनी केला. राहुल गांधी यांनी एका खासदारला धक्का दिला. त्यामुळे ताे खासदार माझ्या अंगावर पडला आणि माझ्या डाेक्याला जखम झाली, असा दावा प्रताप चंद्र सारंगी यांनी केला.
नव्या संसदेच्या मकर द्वाराच्या परिसरात हा धक्काबुकीचा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. प्रताप चंद्र सारंगी जखमी झाल्यानंतर भाजपच्या काही खासदारांनी मल्लिकार्जून खरगे आणि प्रियांका गांधी यांनाही धक्काबुक्की केल्याचे समजते.
राहुल गांधींनी एक खासदाराला माझ्या अंगावर ढकलले, त्यामुळे मी खाली पडलाे आणि जखमी झालाे. मी पायèयांवर उभा हाेताे. त्यावेळी राहुल गांधींनी धक्का दिलेला खासदार माझ्या अंगावर पडला, असा सारंगी यांचा दावा आहे. दरम्यान, प्रताप सारंगी यांना या प्रकारानंतर तातडीने एअर अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रताप सारंगी यांच्या डाेक्याला जखम झाली आहे. त्यांच्यावर सध्या दिल्लीतील राम मनाेहर लाेहिया रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर भाजप खासदार मुकेश राजपूत यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पीयूष गाेयल , धर्मेंद्र प्रधान , शिवराज सिंह चाैहान आणि प्रल्हाद जाेशी इस्पितळात पाेहचले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविराेधात इंडिया आघाडीकडून संसदेत आंदाेलन करण्यात आले. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. अमित शहा यांनी माी मागावी आणि पदाचा राजीनामा द्यावा यासाठी इंडिया आघाडीचे आंदाेलन सुरु आहे. या घटनेनंतर इंडिया आघाडीचे खासदारही आक्रमक झाले आहेत. विराेधी पक्षाचे खासदार मकरदवाराच्या भिंतीवर चढले. नवीन संसदेच्या परिसरात पहिल्यांदाच भिंतीवर चढून आंदाेलन करत आहेत.
राहुल गांधी काय म्हणाले?
या सगळ्या घटनेनंतर राहुल गांधी यांनी आपली बाजू मांडताना म्हटले की, मी संसदेच्या प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न करत हाेताे. त्यावेळी भाजप खासदार मला राेखण्याचा प्रयत्न करत हाेते. ते मला धमकावत हाेते, त्यावेळी हा प्रकार घडला. मला संसदेत जाण्याचा अधिकार आहे. भाजप संविधानावर आक्रमण करत आहे, हा मूळ मुद्दा आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
काँग्रेस खासदार माणिकम टागाेर यांनी या प्रकारानंतर भाजपवर टीकास्त्र साेडले. त्यांनी म्हटले की, आम्ही याबाबत लाेकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहाेत. तत्पूर्वी संसद परिसरात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली इंडिया आघाडीच्या खासदारांनी निषेध माेर्चा काढला.
राहुल गांधींचा उद्दामपणा, भाजपच्या अजित गाेपछडेंची टीका
उद्दामपणा काय असताे ते आम्हाला डाेळ्याने पाहायला मिळाला. हिंदुस्थान आमची जहागीर आहे , अशा रीतीने विचार करणारी मानसिकता आहे . बाबासाहेबांना दाेनदा काँग्रेसने लाेकसभेत येऊ दिले नाही. प्रताप सारंगी गरीब आहेत. ते पडले तर त्यांना बघायला देखील राहुल गांधी थांबले नाहीत. राहुल गांधी लाेकांना ढकलून ढकलून पुढे जात हाेते. जगाचा मालक असल्यासारखे राहुल गांधी पुढे जात हाेते. त्या ढकला ढकलीत ते पडले, मी डाॅक्टर या नात्याने व्हील चेअर वर बसवलं, असे भाजप खासदार अजित गाेपछडे यांनी सांगितले.