MaaharashtraPoliticalUpdate : मोठी बातमी : कोण आहेत होतील नवे मंत्री ? महायुतीतील आमदारांची लॉबिंग , संभाव्य यादीवर होते आहे चर्चा ….
मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी गुरुवारी (5 नोव्हेंबर) आझाद मैदानावर संपन्न झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदेआणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. महायुतीच्या या शपथविधीनंतर हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यात एकूण 288 आमदार असून मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाची मर्यादा 43 इतकी आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची संख्या असू शकत नाही. याचदरम्यान महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे.यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे.
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. देवेंद्र फडणवीस
2. गिरीश महाजन
3. रविंद्र चव्हाण
4. मंगलप्रभात लोढा
5. चंद्रशेखर बावनकुळे
6. आशिष शेलार
7. नितेश राणे
8. शिवेंद्रसिंहराजे भोसले
9. राहुल कुल
10. माधुरी मिसाळ
11. संजय कुटे
12. राधाकृष्ण विखे पाटील
13. गणेश नाईक
14. पंकजा मुंडे
15. गोपीचंद पडळकर
शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. एकनाथ शिंदे
2. उदय सामंत
3. शंभूराज देसाई
4. गुलाबराव पाटील
5. संजय शिरसाट
6. भरत गोगावले
7. प्रकाश सुर्वे
8. प्रताप सरनाईक
9. तानाजी सावंत
10. राजेश क्षीरसागर
11. आशिष जैस्वाल
12. निलेश राणे
अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. धनंजय मुंडे
2. अदिती तटकरे
3. अनिल पाटील
4. हसन मुश्रीफ
5. धर्मराव बाबा अत्राम
6. अजित पवार
7. छगन भुजबळ
कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष
दरम्यान आज भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांना हंगामी अध्यक्ष म्हणून राजभावनात शपथ देण्यात आली. विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते. दिनांक 7, 8 आणि 9 डिसेंबर या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशन दरम्यान हे हंगामी अध्यक्ष विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.