Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AccidentNewsUpdate : शिवशाही बस उलटली , ८ जणांचा मृत्यू , अनेक प्रवासी गंभीर

Spread the love

गोंदिया : गोंदियामध्ये शिवशाही बसला झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सध्या बचाव कार्य सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

भंडारा-गोंदिया या शिवशाही बस क्रमांक एम.एच.०९, एम १२७३ ही भंडाराहून गोंदियाकडे येत असताना गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा जवळ हा अपघात झाला. या बसमध्ये जवळपास ४० प्रवासी प्रवास करीत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अधिक माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ आज दुपारी 1 च्या सुमारास नागपुरहून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस उलटली. या अपघातात 7-8 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, गोंदिया एसटी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी परिवहन प्रशासनाला आदेश दिले आहेत.

मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे शिंदे यांचे आदेश

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर अपघाताबाबत स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच जखमींना तातडीने आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना देखील एकनाथ शिंदेंनी दिल्या. त्याचप्रमाणे अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देखील एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी- देवेंद्र फडणवीस

गोदिंयामधील शिवशाही बस अपघातावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक्सवर (आधीचे ट्विटर) पोस्ट करत अतिशय दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलं आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनीनजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलविण्याची व्यवस्था करा, असेही मी गोंदियाच्या जिल्हाधिकार्‍यांना सांगितले आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, ते मदतकार्यासाठी समन्वय करीत आहेत. या घटनेतील जखमींना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

https://x.com/Dev_Fadnavis/status/1862415575680455158?

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!