NCPNewsUpdate : शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेतला असा चिमटा..

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकलं ते म्हणतात आम्ही देता आहोत घेता नाही. माझे एवढेच म्हणणे आहे , लोकांचा मताचा अधिकार खरेदी करण्यासाठी देऊ नका, लोकांच्या आयुष्यात चांगला बदल करायचा असेल तर माझी काही हरकत नाही.. पण त्याचा वापर संसदीय पद्धती उद्धवस्त करण्यासाठी होऊ नये, यासाठी आग्रह आहे, असा चिमटा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेतला . बारामतीत वकील संघटनेच्या मेळाव्याला यावेळी संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी संविधान बदलाचा मुद्दा, महाराष्ट्राची बिघडलेली कायदा व सुव्यवस्था यावर भाष्य केले. दरम्यान बारामतीकरांना उद्देशून बोलताना, तुम्ही मला दरवेळी निवडून दिलं, घरी पाठवलं नाही, असे उद्गार काढले.
पवार पुढे म्हणाले की , सत्ताधारी लोकांना संविधानात बदल करायचा होता.हेगडेंसारख्या काहींनी तशी भाषणं देखील केली होती. मोदींनी सांगितले 400 पार द्या का ते सांगितले नाही. संविधानात बदल करायचा असेल तर तो आकडा 400 पार पाहिजे म्हणून तो सांगितला गेला होता. मात्र, लोकं आपल्यापेक्षा हुशार लोकांनी सत्ता दिली पण 400 पारची ताकद दिली नाही. राज्यात आपण 5 वर्षात 3 मुख्यमंत्री पाहिले. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते. त्यांच्या सरकारमध्ये ते मंत्रिमंडळ मध्ये होते. मी त्यांचे भाषण ऐकत होतो. ते म्हणाले मागच्या सरकारने चुका केल्या. पण ते हे विसरले की ते मागच्या मंत्रिमंडळामध्ये होते.
महाराष्ट्र हे 1 नंबरवरुन 6 वर गेलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था याबाबत महाराष्ट्रचा नंबर खाली गेला आहे. आज स्त्रियांना सुरक्षा देण्याची गरज निर्माण झाली आहे. बदलापूर प्रकरणात ज्यांच्यावर प्रशासन ठेवायची जबाबदारी आहे त्यांच्यावर आरोप केले गेले याची आठवण शरद पवार यांनी करुन दिली. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा कायदा केला होता वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलींना अधिकार द्यायचा, याची आठवण देखील शरद पवार यांनी करुन दिली.
दरम्यान सुप्रिया सुळेंच्या निवडणुकीमध्ये मी कधीही पाहिले नाही असं झालं.पैशाचा गैरवापर झाला. रात्री बँक उघडी ठेवली. हे कधीही लोकसभेला पाहिले. पण देणाऱ्या पेक्षा घेणारे शहाणे निघाले, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.