Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MahayutiNewsUpdate : आम्ही बोलतो ते करुन दाखवतो, म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली १०आश्वासने….

Spread the love

कोल्हापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारतोफांचा झंझावात आजपासून सुरू झाला असून महाविकास आघाडी व महायुतीचे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. महायुतीची संयुक्त सभा आज कोल्हापूरातून होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरातूनच महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणांची माहिती दिली आहे.  त्यानुसार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा मिळणार असल्याची माहिती दिली, तसेच आम्ही बोलतो ते करुन दाखवतो, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.

कोल्हापूरच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महायुतीच्यावतीने 10 वचने जाहीर करण्यात आली आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाणार असून तत्पूर्वीच जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. त्यामध्ये, लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. तसेच, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकाही मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलीय. विरोधक लाडक्या बहीण योजनेला विरोध म्हणून कोर्टात गेले, आता नागपूरचा कोणतरी कोर्टात गेला आहे. कोणाच्या माय का लाल आला तरी ही योजना बंद होणार नाही, तुमचे आशीर्वाद मिळाल्यानंतर तुम्हाला देताना आमचे हात आकडते घेणार नाही. आम्ही दिल्लीला जातो तर म्हणता दिल्लीला जातात, आम्ही निधी आणायला जातो. पण तुम्ही दिल्लीला जाता की माझा चेहरा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा म्हणून. मात्र, तुमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना तुमचा चेहरा नको आहे, तर महाराष्ट्रातील जनता कशी स्वीकारेल, असा टोलाही उद्धव ठाकरेंना लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 10 घोषणा

1) लाडक्या बहिणींना1500 वरुन रु.2100 देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन!

2) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून प्रत्येक वर्षाला रु.12,000 वरुन रु.15,000 देण्याचे तसेच MSP वर 20% अनुदान देण्याचे वचन!

3)  प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन!

4) वृद्ध पेन्शन धारकांना 1500 वरुन रु.2100 देण्याचे वचन!

5)  राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन!

6) 25 लाख रोजगार निमिर्ती तसेच प्रशिक्षणातून महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 विद्यावेतन देण्याचे वचन!

7) 45,000 गावांत पाणंद रस्ते बांधणार राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन!

8) अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला रु.15,000 वेतन आणि संरक्षण देण्याचे वचन!

9) वीज बिलात 30% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन!

10) सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@2029 ‘ 100 दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन!

आपलं सरकार

Click to listen highlighted text!