Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NCP Dispute Update : राष्ट्रवादी पक्षाचा वादाचा निकाल विधानसभेच्या आधी लावा, शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयाला विनंती …

Spread the love

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाशी संबंधित राष्ट्रवादीच्या प्रकरणाची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणी व्हावी, अशी मागणी शरद पवार गटाच्या वतीने करण्यात अली आहे. या अर्जाची दखल घेऊन निवडणूक चिन्ह वापरण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी 1 ऑक्टोबरची तारीख निश्चित केली आहे.

न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार होती. मात्र, या प्रकरणावर सुनावणी होऊ न शकल्याने आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आणि न्यायालयाच्या सुट्ट्या लक्षात घेता तात्काळ दिलासा मागितला जात असल्याचे शरद पवार गटाच्या वकिलांनी सांगितले.

या दोन्ही गटांमध्ये यावरून गोंधळ असल्याचा पुरावा असल्याचा दावा वकिलाने केला आणि निदर्शनास आणून दिले की मंगळवारीही प्रतिवादी-अजित पवार (महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री) यांनी याचिकाकर्ते-शरद पवार हे “त्यांचे देव” असल्याचे उद्धृत करताना आम्ही एकत्रच आहोत असे म्हटले होते. मात्र, अजित पवार गटाच्या वकिलांनी काल रात्रीच अर्ज दाखल करण्यात आल्याचा दावा केला असून उत्तर देण्यासाठी ४ दिवसांची मुदत मागितली आहे.

या सबमिशनची दखल घेत न्यायमूर्ती कांत यांनी तोंडी टिपणी केली की मागील प्रसंगी दोन्ही पक्ष या आदेशाने खूश होते. दरम्यान प्रत्युत्तरात, शरद पवार गटाच्या वकिलांनी आरोप केला की दुसरी बाजू न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशाचे पालन करत नाही आणि मुद्दाम गोंधळ निर्माण करत आहे; अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी प्रतिवादीला नवीन निवडणूक चिन्हासाठी अर्ज करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

शेवटी, खंडपीठाने हे प्रकरण 1 ऑक्टोबरला सूचीबद्ध केले.

निवडणूक आयोगाच्या ६ फेब्रुवारीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका शरद पवार गटाने दाखल केली होती. या निर्णयात अजित पवार गटाला अधिकृतपणे खरी राष्ट्रवादी म्हणून मान्यता देण्यात आली आणि त्यांना पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘घड्याळ’ देण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!