Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ElectionNewsUpddate : दोन राज्यांच्या निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा…

Spread the love

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत आज जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. जम्मू काश्मीरमधील निवडणुका तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबर रोजी, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 25 सप्टेंबर आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर हरियाणातील निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून 1 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल आणि 4 ऑक्टोबर रोजी दोन्ही राज्यांतील मतमोजणी करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेची मुदत ही 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर हरियाणा विधानसभेची मुदत ही 3 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तसेच जम्मू आणि काश्मिरच्या निवडणुकीसंबंधी 30 सप्टेंबरपूर्वी निवडणूक घोषित करा, त्याचे नियोजन करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते.

महाराष्ट्रातील निवडणुका ‘या’ कारणाने लांबणीवर

दरम्यान महाराष्ट्रात पाऊस आहे त्यामुळे निवडणूक आयोगाचे बरेच काम राज्यात बाकी आहे. तसेच महाराष्ट्रात पुढील काही दिवसात बरेच सण उत्सव आहेत, जसे की गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी यामुळे निवडणुक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले नाही. तारीख अजून या कारणाने निघाली नाही असे निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, “जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर निवडणुका होणार असून एकूण 90 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये जम्मूतील 43 आणि काश्मीरमधील 47 जागांचा समावेश असणार आहे. निवडणूक आयोगाने जम्मूमधील सांबा, कठुआ, राजौरी, किश्तवाड, डोडा आणि उधमपूर या भागातील एक-एक जागा वाढवण्यात आली असून काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात एक विधानसभा मतदारसंघ वाढवण्यात आला आहे,” अशी माहिती कुमार यांनी दिली आहे.

दरम्यान, “लोकसभा निवडणुकीत जम्मू काश्मीरमध्ये मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. मतदानासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. जम्मू काश्मीरमधील लोकांना चित्र बदलायचे असून ते निवडणुकांसाठी उत्सुक असल्याचं दिसत आहे,” असंही राजीव कुमार म्हणाले.

https://x.com/ANI/status/1824391503755747786?

जम्मू आणि काश्मिमधील 370 कलम हटवल्यानंतर त्या ठिकाणी कोणतीही निवडणूक घेण्यात आली नव्हती. आता 10 वर्षांनंतर त्या राज्यात निवडणूक होणार आहे. जम्मू-काश्मिरमधील निवडणुका घ्या अशी मागणी तिथल्या राजकीय पक्षांनी केली होती. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. त्यानंतर 30 सप्टेंबरपूर्वी निवडणुकीचा निर्णय घ्या, त्याचे नियोजन करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले होते.

हरियाणाच्या 90 जागांसाठी मतदान

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, हरियाणात एकूण 90 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 73 सर्वसाधारण, SC-17 आणि ST-0 आहेत. हरियाणात एकूण 2.01 कोटी मतदार असतील. त्यापैकी 1.06 पुरुष, 0.95 कोटी महिला, 4.52 लाख नवीन मतदार आणि 40.95 लाख युवा मतदार आहेत. हरियाणाची मतदार यादी 27 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध होईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!