MaharashtraPolitical : महायुतीने मारली बाजी तर महाविकास आघाडीत बिघाडी , जयंत पाटील , कपिल पाटील नाराज तर काँग्रेसवर प्रकाश आंबेडकरांची टीका…

मुंबई : आज झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने आपले सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली होती या उलट महाविकास आघाडीतील काँग्रेसने आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपले उमेदवार निवडून आणण्यापलीकडे काहीही केले नसल्याचे दिसून आले या उलट ह्मविकास आघाडीच्या मित्र पक्षाचे उमेदवार, सलग पाच टर्म आमदार राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या विजयासाठी मात्र कुठलेही सामूहिक प्रयत्न केले न गेल्याने जयंत पाटील यांना पराभव सहन करावा लागला. या धामधुमीत काँग्रेसची ८ मते फुटल्याने काँग्रेसवर टीका होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यावर टीका केली असून स्वतः जयंत पाटील आणि कपिल पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे पराभव समोर दिसत असतानाच या पराभवाने व्यथित झालेले जयंत पाटील यांना मतमोजणी सुरु झाल्यानंतर काही क्षणांमध्येच विधानभवातून बाहेर पडून थेट अलिबागच्या दिशेने रवाना झाले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रियाही दिली. यावेळी त्यांच्या बोलण्यातून विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची मदत न प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील यांच्या या नाराजीनंतर इंडिया आघाडीचा भाग असणारे समाजवादी गणराज्य पक्षाचे विधानपरिषदेतील आमदार कपिल पाटील यांनीही ट्विट करुन याबाबत भाष्य केले.
सामूहिक प्रयत्नात कमी पडल्याने या निवडणुकीत काँग्रेसची ८ मते फुटली त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. शिवाय ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना महायुतीतील पक्षांची मते फोडण्यात अपयश आले आहे. दरम्यान, निवडणुकीत काँग्रेसची ८ मते फुटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी हल्लाबोल केलाय. प्रकाश आंबेडकरांनी ट्वीट करत काँग्रेसवर टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या किमान ८ आमदारांनी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला क्रॉस व्होटींग केले. काँग्रेसने दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ओबीसींना मुर्ख बनवले आणि त्यांचा वापर केला. तरीही हे लोक संविधान वाचवणार आहेत असे तुम्हाला वाटते? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
याशिवाय कपिल पाटील यांनी आपल्या ट्विटमधून , इंडिया आघाडीत आपण सोबत राहिलो. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना मतदान केले. इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांची तक्रार होती की, भाजपने त्यांचे पक्ष चोरले, पळवले. पण इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांशी मोठे पक्ष कसे वागले ? भाजपसारखेच ? तूर्त रजा घेतो, पण कायम तुमच्या सोबत आहे, अशी खंत बोलून दाखवली.
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. ठाकरे गटाने शेवटच्या क्षणी मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवल्याने विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होऊ शकली नव्हती. नार्वेकरांच्या एन्ट्रीमुळे ही निवडणूक चुरशीची होणार, हे अपेक्षित होते. अखेर या चुरशीच्या लढतीत महायुतीच्या सर्व उमेदवारांनी बाजी मारली. मात्र, मिलिंद नार्वेकर यांना निवडून आणण्याच्या नादात जयंत पाटील यांचा पराभव झाला. जयंत पाटील अनेक वर्षे विधानपरिषद निवडून येण्याची किमया साधत होते. कोणत्याही बड्या राजकीय पक्षात नसताना जयंत पाटील आमदारांच्या मतांची जुळजाजुळव करुन निवडून येत होते. त्यामुळे अनेकांना जयंत पाटील यांना विधानपरिषदेत बघण्याची सवय झाली होती. मात्र, आजच्या पराभवाने जयंत पाटील यांनी विजयी परंपरा खंडित झाली आहे. हा पराभवाचा ओरखडा महाविकास आघाडीची मोठा आहे.