राहुल गांधींनी संविधानाच्या मुद्द्यावरून भाजपला पकडले कोंडीत, पीएमओ इंडियाच्या प्रोफाइल चित्रावर आले घटनेला नमन करणारे मोदी ….

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर, पीएमओ इंडियाने आता अधिकृत X खात्याचे प्रोफाइल चित्र आणि कव्हर फोटो अपडेट केला आहे. पीएमओ इंडियाने X खात्याच्या कव्हर फोटोमध्ये पीएम मोदींचे संविधानाला नमन करतानाचे चित्र समाविष्ट केले आहे.
मात्र, पीएमओ इंडियाचा फोटो बदलल्याबद्दल काँग्रेसने पीएम मोदींची खरडपट्टी काढली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, राहुल गांधींच्या विचारांचा थेट परिणाम संविधानाच्या सुरक्षेवर 2024 च्या निवडणुकीसाठी निर्णायक मुद्दा आहे.
This is the direct impact of Rahul Gandhi's singleminded focus on protection of the Constitution as the defining issue of the 2024 elections https://t.co/JYMIwAVFUn
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) June 11, 2024
खरे तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी संविधानाच्या रक्षणाचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान मोदी आणि भाजपला कोंडीत पकडले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक रॅलीमध्ये म्हटले होते की, भाजप केंद्रात सत्तेत परत आल्यास गरीब, दलित, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांना हक्क देणारी राज्यघटना फाडून टाकेल. राहुल गांधी म्हणाले होते की, त्यांचा पक्ष आणि भारत आघाडीतील सहयोगी पक्ष संविधान वाचवण्यासाठी लढत आहेत.