Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : एनडीए कडून सरकार स्थापनेच्या हालचाली , उद्या नेता निवडीसाठी बैठक , ८ जूनला येणार नवे सरकार !!

Spread the love

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत २९२ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) काल औपचारिक बैठक झाली.. या बैठकीत ज्यांच्या नावाची विशेष चर्चा चालू आहे ते तेलुगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू व संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांच्यासह सर्व घटकपक्षांच्या संसदीय दलाचे नेते उपस्थित होते . या बैठकीत भाजपनेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला असला तरी उद्या होणाऱ्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड होईल असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आघाडीच्या वतीने सरकार स्थापनेचा दावा करण्यात येईल. दरम्यान सध्या तरी बहुचर्चित चंद्राबाबू आणि नितीश कुमार एनडीएसोबत असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक बुधवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावण्यात आली होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतेपदावर विषावस व्यक्त करण्यात आला तसेच या बैठकीत करण्यात आलेल्या प्रास्तावावर सर्व नेत्यांनी साह्य केल्या आणि हे पत्र जनतेसाठी खुले करण्यात आली.

दरम्यान नितीश कुमार यांनी एनडीएने सरकार स्थापनेचा तातडीने दावा करण्याची मागणी केली, तर चंद्राबाबू नायडू यांनीही त्यास उशीर करू नये, असेही मत व्यक्त केले. दरम्यान, या बैठकीनंतर चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान नायडू यांनी लोकसभाध्यक्षपदासह तीन महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली आसल्यासाचे वृत्त आहे.

शुक्रवारी राष्ट्रपतींकडे दावा; शनिवारी शपथविधी?

माध्यमांच्या माहितीनुसार उद्या शुक्रवार, ७ जून रोजीसकाळी ११ वाजता भाजप संसदीय पक्षाची बैठक होऊन त्यामध्ये नरेंद्र मोदी यांची भाजपच्या नेतेपदी निवड केली जाईल आणि नंतर एनडीएच्या सर्व खासदारांची दुपारी २ वाजता बैठक होऊन त्यात एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात येईल. आणि या बैठकीनंतर एनडीएचे सर्व प्रमुख नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ स्थापनेचा दावा करतील. त्यानंतर शनिवारी, ८ जून रोजी नव्या मंत्री मंडळाला राष्ट्रपती शापाठ देतील.

राष्ट्रपतींकडून लोकसभा विसर्जित, मोदींचा राजीनामा

दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी बैठकीत केलेल्या शिफारशीनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना १७ वी लोकसभा तातडीने विसर्जित केली. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत केंद्रीय मंत्रिमंडळासह पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपतींनी पंतप्रधानांसह मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारत लोकसभा विसर्जित केली तसेच नव्या सरकारने कार्यभार स्वीकारेपर्यंत नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळांने आपली सेवा बजावावी अशी सूचना केली.

शपथविधीसाठी या देशांना निमंत्रण

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून माध्यमांच्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंका आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांना तसेच नेपाळ आणि मॉरिशस, श्रीलंकेचे राष्ट्रपती आणि भूतानचे राजा यांना या आठवड्याच्या अखेरीस त्यांच्या शपथविधीसाठी निमंत्रित करण्यात आले असून विक्रमसिंघे आणि हसीना या दोघांनीही पंतप्रधान मोदींनी दिलेले निमंत्रण स्वीकारले आहे.

याआधी बुधवारी पंतप्रधान मोदी यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केल्यानंतर या सर्व नेत्यांचे आभार मानले. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील एनडीएने विजय मिळवल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया. मेलोनी, जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासह 75 हून अधिक जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!