पंतप्रधान मोदींची कॉँग्रेसवर जोरदार टीका, म्हणाले , अदाणी-अंबानींशी राहुल गांधींची गूप्त डील…. !!

नवी दिल्ली : नेहमी राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना मोदींनी त्यांचे मित्र अडाणी , अंबानी यांचे कर्ज माफ केले अशी टीका सातत्याने करतात. परंतु यावेळी मात्र बुधवारी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर मोदींनी जोरदार हल्ला बोल करीत काँग्रेस पक्षाने अदाणी आणि अंबानी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात काळा पैसा गोळा केला असून हे पैसे घेतल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर टीका करणे बंद केले असल्याचा आरोप केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्याचा दौरा करत आहेत. एका प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले, “तुम्ही मागचे पाच वर्ष पाहिले असेल की, काँग्रेसचे राजकुमार , अदाणी आणि अंबानी यांच्या नावाचा जयघोष करत होते. मात्र निवडणूक जाहीर होताच अचानक त्यांनी अदाणी आणि अंबानी यांच्याविरोधात बोलणं बंद केलं आहे. दोन्ही उद्योगपतींकडून त्यांना किती बॅगा भरून काळा पैसा मिळाला? अदाणी-अंबानी आणि राहुल गांधी यांच्यात अशी कोणती डील झाली? ज्यामुळे आता एका रात्रीत राहुल गांधी यांचा दृष्टीकोन बदलला.”
विशेष म्हणजे राहुल गांधींच्या अडाणी , अंबानीवरील आरोपांना तप्रधान मोदींनी कधीही उत्तर दिले नाही परंतु पहिल्यांदाच उद्योगपती अदाणी-अंबानी यांचे नाव घेत राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. भाजपा आणि पंतप्रधान मोदी हे उद्योगपतींना धार्जिणे निर्णय घेत आहेत. शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कर्ज लादून भांडवलदारांना कोट्यवधींची कर्जमाफी दिली, असा आरोप काँग्रेसकडून वारंवार केला जात होता.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उत्तर देत असताना काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा म्हणाल्या की , “राहुल रोज उद्योगपतींबद्दल बोलत आहेत. त्यांचे सत्य लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपा आणि बड्या उद्योगपतींचे साटेलोटे असल्याचे आम्ही उजेडात आणत आहोत. पंतप्रधान मोदींनी आपल्या मित्रांचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले. दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्यमे मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र त्यांची कर्जमाफी केली जात नाही.”