राजीव गांधींप्रमाणेच राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना वडील राजीव गांधींप्रमाणेच बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर राहुल गांधी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली आहे.
यासोबतच त्यांच्या निवासस्थानाबाहेर सिव्हिल ड्रेसमधील अधिकारीही तैनात करण्यात आले आहेत. तसेच राहुल गांधींना सध्या झेड प्लस सुरक्षा मिळाली आहे.
या धमकीची गंभीर दखल घेत गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथक इतर शाखांनी याबाबत शहानिशा केली असता ज्या व्यक्तीने फोन केला होता. तो व्यक्ती नाशिक येथील गंगापूर हद्दीत राहत असून मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे समोर आले आहे.
भारत न्याय जोडो यात्रेनिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिकमध्ये येणार आहेत. मात्र त्यापूर्वी राहुल गांधी यांना राजीव गांधींप्रमाणे बॉम्बने उडवून देण्याचा कॉल काही दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांना आला होता.
या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करत धमकी देणाऱ्याला ताब्यात घेतले असून तो माथेफिरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
संबंधित व्यक्तीने फोन हा दारूच्या नशेत केला होता. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेचा अहवाल केंद्रीय तपास यंत्रणांना पाठवण्यात आला आहे. तसेच राहुल गांधींच्या दौऱ्याबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात असून त्यांच्या सुरक्षेत आणखी वाढ केली जाणार आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765