एलोन मस्कने चॅटजीपीटी तयार करणाऱ्या कंपनीला खेचले कोर्टात…

टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी चॅटजीपीटी बनवणाऱ्या ओपन एआय कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे. यासोबत त्यांनी ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमन यांच्यावरही मोठे आरोप केले आहेत. कंपनीने आपल्यासोबत केलेल्या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप मस्कने केला आहे.
काय आहे प्रकरण?
Open AI कंपनीचे संस्थापक सॅम अल्टमन आणि ग्रेगरी ब्रॉकमॅन यांनी कंपनीच्या स्थापनेवेळी एलोन मस्कची मदत मागितली होती. यावेळी त्यांनी म्हटले होते; की ही एक ‘नॉन-प्रॉफिट’ कंपनी असेल, जी मानवजातीच्या कल्याणासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी डेव्हलप करेल. ही कंपनी नफा कमावण्याचा विचार करणार नाही, या अटीवरच इलॉनने कंपनीच्या स्थापनेसाठी मदत केली होती; असे मस्कच्या वकिलांनी म्हटले आहे.
कंपनीने मोडला करार
एलोन मस्कने आरोप केले आहेत, की ओपन एआय कंपनी आता पूर्वीप्रमाणे नॉन-प्रॉफिट राहिलेली नाही. कंपनी नफ्यावर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे आपल्यातील मूलभूत कराराचे उल्लंघन झाले आहे. मस्कने यापूर्वी आपल्या एक्स हँडलवरुन याबाबत बोलत नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता त्याने कंपनीला थेट कोर्टात खेचले आहे.
एलोन मस्कने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये Sam Altman, Gregory Brockman यांची नावे प्रामुख्याने घेतली आहेत. ओपन एआयमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेल्या मायक्रोसॉफ्टच्या (Microsoft) काही अधिकाऱ्यांची नावंही यामध्ये घेण्यात आली आहेत.
मस्कनेच दिले ओपन-एआय नाव
2015 साली सॅम, ग्रेगरी आणि मस्क या तिघांनी मिळून ओपन एआय कंपनीची सुरुवात केली होती. ही कंपनी नफ्याचा विचार करणार नाही, आणि लोकांसाठी काम करेल म्हणून इलॉन मस्कनेच याचे नाव ‘ओपन’ एआय असे ठेवले होते. मस्कने स्वतःच ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765