दिल्ली चलो मोर्चा : निवडणूक आचारसंहितापूर्वी आमच्या मागण्यांवर तोडगा काढा…

शेतकरी आपल्या मागण्या घेऊन दिल्ली चलो मार्चला निघाले आहेत. मात्र पोलिसांनी गेल्या 6 दिवसांपासून शंभू त्यांना शंभू सीमेवर अडवले असून शेतकऱ्यांना पुढे जाऊ दिले जात नाही. तसेच हरियाणामध्ये इंटरनेट बंदीची मुदत वाढवण्यात आली आहे.
पंजाब आणि हरियाणाची संयुक्त राजधानी चंदीगड येथे सायंकाळी 6 वाजता शेतकरी नेते केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, पीयूष गोयल आणि नित्यानंद राय यांची भेट घेणार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या चर्चेच्या तीन फेऱ्यांमध्ये इतर अनेक मुद्द्यांवर सहमती झाली होती, परंतु तीन प्रमुख मुद्द्यांवर अद्याप तोडगा निघालेला नाही.
महत्त्वाच्या बैठकीपूर्वी, शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांनी सांगितले की, सरकारने या प्रश्नावर हलगर्जीपणा टाळावा आणि तोडगा काढावा. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारने आमच्या मागण्यांवर तोडगा काढावा. तीन दिवसांपूर्वी झालेल्या शेवटच्या बैठकीत शेतकऱ्यांनी शांतता राखून रविवारी पुढील चर्चा करण्याचे मान्य केले होते.
21 फेब्रुवारी रोजी यूपीमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा
सर्व पिकांना एमएसपी हमीभाव कायदा करावा आणि आपल्या मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. पंजाब आणि हरियाणाच्या शेतकरी संघटना आपापल्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहेत.
दरम्यान, भारतीय किसान युनियनने (BKU) 21 फेब्रुवारी रोजी यूपीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने सात जिल्ह्यांतील इंटरनेट बंदी 19 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे.
चंदीगडमध्ये शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये चर्चेची चौथी फेरी
लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारवर दबाव टाकण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. आत्तापर्यंत शेतकरी आणि सरकार यांच्यात तीन वेळा बोलणी झाली, मात्र अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.
सरकारने एमएसपीबाबत अध्यादेश काढावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या अनुषंगाने रविवारी चंदीगडमध्ये शेतकरी संघटना आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार आहे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडे चर्चेसाठी वेळ मागितला
पंजाब किसान मजदूर संघर्ष समितीने रविवारी सांगितले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी थोडा वेळ मागितला आहे. समितीचे सरचिटणीस सर्वनसिंग पंढेर यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री आणि शेतकरी यांच्यात चर्चा होणार असून सरकार या प्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.
संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाने त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रावर दबाव आणण्यासाठी दिल्ली चलोची हाक दिली आहे.
यावर लवकरच तोडगा काढू : कृषिमंत्री अर्जुन मुंडा
13 फेब्रुवारीला शेतकऱ्यांनी दिल्ली चलो मार्च सुरू केला होता. नुकतेच केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी शेतकऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले होते. गुरुवारी केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात चर्चेची तिसरी फेरी झाली, त्यात अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. शांततेच्या मार्गाने चर्चा पुढे नेली तर निश्चितच काही निष्कर्षापर्यंत पोहोचू, असे ते म्हणाले. आशा आहे की आम्ही लवकरच यावर तोडगा काढू.
शेतकऱ्यांच्या मागण्या काय?
एमएसपी कायद्याव्यतिरिक्त, दिल्लीत मोर्चा काढणारे शेतकरी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, कर्जमाफी, शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन आणि पोलिस केस मागे घेण्याची मागणी करत आहेत.
दिल्ली देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच गाझीपूर, सिंघू आणि इतर सीमा बिंदू अंशतः सील करण्यात आले आहेत. त्यांचे ट्रॅक्टर आणि ट्रॉली रस्ता ओलांडू नयेत म्हणून रस्त्यांवर काँक्रीटचे ब्लॉक आणि स्पाइक टाकले आहेत.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765