दिल्ली चलो ठिय्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू

पंजाब-हरयाणा सीमेवर गेल्या १३ फेब्रुवारीपासून हजारो शेतकरी दिल्ली चलो आंदोलन करत आहेत. हरयाणा सरकारने शेतकऱ्यांना शंभू सीमेवर अडथळे निर्माण करून रोखून ठेवले आहे. दरम्यान, सीमेवर ठिय्या आंदोलन करणाऱ्या पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील ज्ञान सिंग (वय७०) या शेतकऱ्याचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला आहे.
शेतकरी ज्ञान सिंगला पहाटे ४ वाजता राजपुरा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना पटियाला येथील शासकीय राजिंद्र रुग्णालयात नेण्यात आले. दरम्या, रुग्णालयात आपत्कालीन विभागात अर्ध्या तास उपचार केल्यानंतर या शेतकऱ्याने अखेरचा श्वास घेतला.
‘या शेतकऱ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यांना राजिंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला’ अशी माहिती राजिंद्र रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी दिली.
इंटरनेट बंदीची मुदत वाढवली
पंजाब-हरियाणातील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी तीन दिवसांपासून सीमेवर ठाण मांडून आहेत. सरकारसोबतच्या चर्चेच्या तीन फेऱ्या निष्फळ ठरल्या असून शेतकरी दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत.
याबाबत पोलीस प्रशासन पंजाब-हरियाणा सीमेवर चोख बंदोबस्त ठेवत आहे. दरम्यान, हरियाणा सरकारने आता 7 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंदीची मुदत वाढवली आहे.
हरियाणा सरकारने आपल्या नवीन आदेशात म्हटले आहे की, शेतकरी आंदोलनाची हाक लक्षात घेता तणाव, चिडचिड, आंदोलन, सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिसार, फतेहाबाद आणि सिरसा जिल्ह्यात शांतता भंग होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मोबाइल इंटरनेट सेवा, एसएमएस सेवा आणि इतर डोंगल सेवांवर बंदी 17 फेब्रुवारी रोजी रात्री 11:59 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
सरकारशी चर्चेतून कुठलही मार्ग नाही , शेतकरी आंदोलन कायम, आज भारत बंदचे आवाहन , दिल्लीची सीमा बंद…
किमान हमी भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
शेतमालाला किमान हमी भाव मिळावे यासह अन्य विविध मागण्यांसाठी पंजाबच्या शेतकऱ्यांनी १३ फेब्रुवारी रोजी ‘चलो दिल्ली’ आंदोलनाची हाक दिली होती. राजधानी दिल्लीच्या दिशेनं निघालेल्या शेतकरी संघटनांनी आज, १६ फेब्रुवारी रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. हा बंद ग्रामीण भारतापुरता मर्यादित असेल. सर्व समविचारी शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन बंदमध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन संयुक्त किसान मोर्चानं केलं आहे. या बंदला समाजातील विविध कामगार संघटना तसेच मान्यवर व्यक्तिंनी पाठिंबा दिला आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765