ASHA workers protest : शासन निर्णय जारी होत नाही, तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही

मुंबईतील आझाद मैदानावर आशासेविका व गटप्रवर्तकांनी वेतनवाढीसह आपल्या अन्य प्रलंबित मागण्यासांठी आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशा सेविकांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा झाली.
तसेच त्यांच्या मागण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. मात्र, जोपर्यत याचा शासन निर्णय जारी होत नाही, तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याची भूमिका आशासेविका संघटनांनी घेतली असून आंदोलनावर ठाम असल्याचे म्हटले आहे.
राज्यातील ३० हजार आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांनी शासनाने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी शासन निर्णय जाहीर करा, अशी मागणी करीत शहापूर ते मुंबई लाँग मार्च काढत आझाद मैदानावर आंदोलन केले आहे.
हजारो आशासेविका आझाद मैदानात दिवस- रात्र आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागण्यांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. प्रधान सचिवांना याबाबत जबाबदारी देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला सांगितले. शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आशासेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, शासन निर्णय होईपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, यावर आशा वर्कर व गट प्रवर्तक ठाम आहेत.
दरम्यान, गुरुवारी लखनौमधील इको गार्डन येथे देखील आशासेविकांनी दोन दिवसीय आंदोलन सुरू केले. किमान वेतनात वाढ आणि शासकीय कर्मचारी म्हणून अधिकृत मान्यता मिळावी या मागणीसाठी शेकडो आशासेविकांनी आंदोलन सुरू केले आहे. उत्तर प्रदेश आशा बहू कल्याण समिती (UPABKS) द्वारे निषेधाची हाक देण्यात आली होती, त्यानंतर राज्यभरातील आशा वर्कर्स लखनौमध्ये जमल्या आहेत.
आम्ही आशासेविकांना ₹18,000 आणि आशा संगिनी (पर्यवेक्षक) साठी ₹24,000 किमान वेतनाची मागणी करत आहे. ही किमान रक्कम त्यांना मिळायला हवी, कारण सध्या ते रु.12000 पेक्षा जास्त कमावत नाहीत,” असे इंदू बाला, UPABKS चे राज्य उपाध्यक्ष यांनी सांगितले.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765