जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना चौकशीसाठी ED ने पाठवले समन्स, काय आहे प्रकरण ?

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे.
८६ वर्षीय फारुख अब्दुल्ला यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले असून गेल्या महिन्यातही त्यांना याप्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. महिन्यातही त्यांना याप्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र ते हजर झाले नाहीत. हे प्रकरण जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे.
ईडीने 2022 मध्ये अब्दुल्ला यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात म्हटले आहे की, फारुख अब्दुल्ला यांनी प्रकरण जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात खेळाच्या विकासाच्या नावाखाली जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी आणि इतर लोकांकडून मिळालेला निधी इतरत्र वळवला आणि त्याचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला.
हा निधी अनेक खाजगी बँक खाती आणि जवळच्या नातेवाईकांना पाठवण्यात आला. नंतर हा पैसा आपापसात वाटून घेतला. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २०१८ मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे ईडीने २०२२ मध्ये हा गुन्हा नोंदवला आहे.
लोकसभेत श्रीनगरचे प्रतिनिधित्व करणारे ८६ वर्षीय फारुख अब्दुल्ला यांनाही गेल्या महिन्यात याच प्रकरणात तपास यंत्रणेने समन्स बजावले होते. अब्दुल्ला यांना पाठवलेल्या समन्समध्ये ईडीने त्यांना श्रीनगर येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. त्यावेळी प्रकृतीचे कारण सांगून ते हजर राहिले नाहीत.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765