मौलाना तौकीर रजा खान यांच्या जेलभरोच्या आवाहनानंतर बरेली शहामतगंज परिसरात दगडफेक

बरेली: मौलाना तौकीर रजा खान यांच्या जेलभरोच्या आवाहनानंतर बरेलीतील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. शुक्रवारच्या नमाजानंतर हजारो समर्थक रस्त्यावर उतरले. नमाजनंतर तौकीर रझा यांनी लोकांना संबोधित केले आणि अटक करुन घेण्यासाठी इस्लामिया ग्राउंडकडे जाण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या समर्थकांना वाटेत अडवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी बॅरिकेड्स तोडले. यानंतर शाहमतगंज परिसरात दगडफेक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बारादरी पोलीस ठाण्याच्या शहामत गंज परिसरात दगडफेक झाली असून काही लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपींविरुद्ध एफआरआय दाखल करण्यात येणार आहे. सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नेमकं काय प्रकरण आहे?
मौलाना तौकीर रझा यांनी हल्दवानी हिंसाचार आणि ज्ञानवापीवरील न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जेलभरोची घोषणा केली होती. शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर ते समर्थकांसह रस्त्यावर आले असता पोलिसांनी त्यांना अडवले. मात्र, मुस्लिम समाजाचे लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमले आणि जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी तौकीर रझा म्हणाले की, देशात द्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमच्या मशिदी आणि घरांवर बुलडोझर चालवला जातोय. अशा परिस्थितीत आपली प्रार्थनास्थळे वाचवणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांसह शांततेने आपला निषेध नोंदवू. मात्र, यावेळी त्यांनी हल्द्वानी हिंसाचारावर सीएम धामी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले.
तौकीर रझा म्हणाले, तुम्ही आमच्या घरावर बुलडोझर चालवलात तर आम्ही गप्प बसू का? आता कोणताही बुलडोझर खपवून घेतला जाणार नाही. सर्वोच्च न्यायालय दखल घेत नसेल, तर आम्ही आमचे संरक्षण करू, कायद्याने आम्हाला अधिकार दिला आहे.
कोणी आपल्यावर हल्ला केला, तर आपण त्याला मारले पाहिजे. यावेळी रझा यांनी पीएम मोदी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यावरही आक्षेपार्ह टिप्पणी केली आणि अपशब्दही वापरले.
सध्या बरेलीचे वातावरण चांगलेच तापले आहे. पोलीस प्रशासन अलर्टवर आहे. इस्लामिया मैदानावर 1000 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. एसपी, डीएसपी यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पीएसी आणि आरएएफलाही तैनात करण्यात आले आहे. अतिक्रमण हटाओ मोहिमेअंतर्गत उत्तराखंडच्या हल्दवानीमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर वातावरण तापले असताना हे सर्व घडत आहे. उत्तराखंड ते यूपीपर्यंत हाय अलर्ट आहे.
NashikNewsUpddate : अंदाधुंद गोळीबारात जखमी झालेल्या भाजपच्या माजी नागरसेवकाचा मृत्यू
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765