Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SamruddhiAccidentNewsUpdate : समृद्धीवरील अपघातात जालना जिल्ह्यातील तीन ठार, दोन जखमी

Spread the love

कोपरगाव : अहम्मद नगर जिल्यातील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात समृद्धी महामार्गांवर स्विफ्ट डिझायर कार व कंटेनरच्या अपघातात तीन जण ठार, तर दोन जर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.9 फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे असे अपघातातील मृतांची नावे आहेत.

अपघातात राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे ( तिघेही राहणार जाफराबाद जिल्हा जालना) अशी मयतांची नावे आहेत. या अपघातात फलके व वाघ हे दोघे जखमी झाले असून त्यांची पूर्ण नावे कळू शकली नाही. जखमींवर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर तिघांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्गावर एक कंटेनर उभा असताना त्यातील चैनल खाली पडलेला होता, हा चॅनल कंटेनर चालक उचलत असताना जालन्याकडून शिर्डी कडे स्विफ्ट डिझायर कार भरधाव वेगाने येत होती.

स्विफ्ट डिझायर कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने समोर असलेला कंटेनर चालकाला धडक देत कार समोरील कंटेनर वर जाऊन आदळली . ही धडक इतकी भयानक होती की स्विफ्ट कारचा पुढील भाग पूर्ण चक्काचूर झाला. दरम्यान, कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!