हेमंत सोरेन यांच्या ईडी कोठडीत पाच दिवसांची वाढ

नवी दिल्ली : कोठडीची मुदत संपल्यानंतर ईडीच्या पथकाने बुधवारी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना न्यायालयात हजर केले. यावेळी दोन्ही बाजूंनी वादावादी झाली. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची अधिक चौकशी करण्यासाठी ईडीने कोर्टाकडे ७ दिवसांची कोठडी मागितली होती. त्यावर न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी मंजूर केली आहे.