चंपई सोरेन झारखंड सरकारने 47 आमदारांच्या पाठिंब्याने फ्लोर टेस्ट जिंकली

राज्याचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईंतर येथील सरकार अस्थिर झाल्याने, झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना काही दिवसांपासून वेग आल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या नेतृत्वातील सरकारने आज झालेली बहुमत चाचणी जिंकली आहे.
आज झालेल्या बहुमत चाचणी दरम्यान सोरेन यांच्या सरकारच्या बाजूने 47 मतं पडली असून 29 मतं विरोधात पडली आहेत. अखेर झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन हेच राहाणार आहे.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केल्यानंतर राजकीय गदारोळ सुरू होता. दरम्यान, चंपई सोरेन यांच्याकडे पक्षाने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर आज चंपई सोरेन यांना बहुमत चाचणीला सामोरे जावे लागले असून या परीक्षेच सोरेन सरकार पास झाले आहे.
या फ्लोर टेस्टपूर्वी आमदार फुटण्याचा धोका लक्षात घेऊन सोरेन सरकारमधील आमदारांना हैदराबादमध्ये हालवण्यात आले होते. अखेर काल संध्याकाळी सर्व आमदार रांची येथे परतले होते. झारखंडमध्ये ऑपरेशन लोटसचा धोका देखील व्यक्त केला जात होता. मात्र यावेळी झारखंडमध्ये भाजपला यश मिळालेले नाही.
किती होते संथ्याबळ ?
झारखंड विधानसभेत एकूण 81 जागा आहेत. त्यामध्ये बहुमतासाठी 41 सदस्यांचे संख्याबळ आवश्यक होते. JMMच्या नेतृत्वाखालील युतीकडे 48 आमदाराचे पक्के बहुमत होते. यामध्ये JMM चे 29, काँग्रेसचे 17, RJD आणि CPI(ML) यांच्या प्रत्येकी एक सदस्यांचा समावेश आहे. यापैकी सरकारच्या बाजूने 47 मते पडली आहेत.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765