Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UddhavThackerayNewsUpdate : इंडिया आघाडीचे जागा वाटप आणि राम मंदिर उद्धघाटन निमंत्रणावरून उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले …

Spread the love

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात जागा वाटपावरून आज शनिवारी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही एक मोठे विधान केले आहे. माझ्या माहितीनुसार, निवडणूक कदाचित ३० एप्रिलच्या आत करतील.. कारण त्यांना सांगितलं आहे की, त्याआधी निवडणुका घेतल्या तर तुमचे ठीक होईल. ३० एप्रिलपर्यंत निकाल लागला पाहिजे असे त्यांना कोणीतरी सांगितले आहे.. असे माझ्या कानावर आले आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटप सुरळीत होईल.. राष्ट्रवादी आणि आमची बोलणी चाललेली आहेत, झालेली आहेत व्यवस्थित.. इंडियाची जेव्हा बैठक झाली दिल्लीत.. तेव्हा मी खर्गे आणि राहुलजींशी बोललेलो आहे.

माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले की , इकडे ज्या बातम्या येत आहेत त्याकडे लक्ष देऊ नका. कारण तसा कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडून आलेला नाही. माझ्याकडून आघाडीमध्ये बिघाडी होऊ देणार नाही. म्हणून कोण काय बोलते त्याकडे लक्ष न देता. काँग्रेसचे जे प्रमुख आहेत ते आमच्याशी बोलत नाही तोवर मी किंवा आमच्याकडून कोणीही यावर भाष्य करणार नाही.

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बरोबर देखील आमची बोलणी सुरू आहे. याबाबत एकत्र बैठक होईल. माझ्याकडे कोणताही फॉर्म्युला आलेला नाही. त्यामुळे जे काही प्रत्यक्ष भेटून मी आणि ते बोलत नाही तोवर त्याबाबत मी बोलणे योग्य नाही. राष्ट्रवादीसोबत आमचा जागा वाटपाचा प्रश्न सुटला आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

मला निमंत्रण आले नाही पण ….

अध्योयेत २२ जानेवारी २०२३ रोजी राममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. या सोहळ्याला संपूर्ण देशभरातून अनेकांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, यावरून आता नव्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT)चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात न आल्याने राज्यात यावरून टीकाटिप्पणी सुरू झाली आहे. मात्र या चर्चेबद्दल स्वत: उद्धव ठाकरेंनी आपले मत व्यक्त केले आहे.

‘मातोश्री’वर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की , ‘मी एक स्पष्ट करू इच्छितो की.. मला आतापर्यंत कोणतंही आमंत्रण आलेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे जाण्यासाठी मला कोणाच्याही आमंत्रणाची गरज नाही. कारण रामलल्ला हे सर्वांचे आहेत. वादाचा प्रश्नच नाही.. ज्यांच्या मनात राम आहे.. त्यांना फडणवीसांनी सांगण्याची गरज काय? राम मंदिर नव्हतं. तेव्हाही रामाची पूजा सुरूच होती. राम मंदिर नव्हतं तेव्हाही आम्ही अयोध्येत जाऊन शरयू आरती केलीच आहे. त्यामुळे ते मंदिर नसताना सुद्धा लाखो भाविक जातच होते. म्हणून तिकडे जाणे न जाणं यात राजकारणाचा भाग नाही.. यामध्ये मीच सगळं काही केलं असं कृपा करून कोणी फुशारकी मारू नये. त्यात लाखो कारसेवकांचा तिकडे लढा होता. त्यासाठी अडवाणींचे खास करून.. म्हणजे त्यांनी ती रथयात्रा काढली नसती तर हे आज झालंच नसतं.

पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये….

माझं तर सोडाच.. अडवाणीजी आणि मुरली मनोहरजी यांनाही आमंत्रण नाही असं ऐकलंय मी.. म्हणून मला असं वाटतं की, याचा राजकीय इव्हेंट होऊ नये.. तो एक मोठा अस्मितेचा लढा होता तो पूर्ण झाला असं मला वाटतं. राम ही काय एका पक्षाची प्रॉपर्टी नाही. ते सर्व राम भक्तांच्या तो आस्थेचा विषय आहे. त्यावर तुम्ही तुमचं राजकारण करू नका. मला निमंत्रणाची अजिबात गरज नाही. जेव्हा मला वाटेल तेव्हा मी दर्शन घेऊ शकतो. तो एकच असा काही मुहूर्त नाही की, त्या दिवशीच जाऊन मी दर्शन घेतलं पाहिजे. मला वाटतं की, त्यांना इव्हेंट करायचा आहे. त्यामुळे हे सगळं होऊ दे. मला राजकारण करायचं नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!