Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaReservationUpdate : मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या ….

Spread the love

नांदेड : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी होत असलेल्या आत्महत्यांचे  सत्र काही थांबण्याच नाव घेत नाही. आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने  आत्महत्येसारखे  टोकाचे पाऊल उचलले आहे. नांदेडमधील  एका 25 वर्षीय तरुणानं मराठा समाजाला  आरक्षण मिळावं या मागणीसाठी विष प्रशान करून आत्महत्या केली  असल्याचे वृत्त आहे.

नांदेडपासून जवळच असलेल्या मरळक येथली घटना आहे. दाजीबा रामदास शिंदे असे  मृत तरुणाचे  नाव आहे. 11 नोव्हेंबरला विष प्रशान केल्यानंतर दाजीबा कदमला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले  होते . दाजीबा कदम यांच्याजवळ एक सुसाईड नोटही आढळून आली. सुसाईड नोटमध्ये समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत आहे, असा मजकूर सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आला होता. पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून दाजीबाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

दाजीबा कदम हा मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाला होता, दाजीबा कदम यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती. आरक्षण नसल्यामुळे दाजीबा काही करू शकला नाही, तसेच त्याच्या वडिलांनी त्यांची दीड एकर शेती विकली होती, असं मृत दाजीबाच्या भावानं सांगितलं, शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करू, असं तहसीलदार विजय आवधान यांनी सांगितलं. तसेच, मराठा आरक्षणावर तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी विठ्ठल पावडे यांनी केली आहे.

जरांगेंचा महाराष्ट्र दौरा …

मनोज जरांगे हे 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर असा राज्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार आहे. एकूण 6 टप्प्यात हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात जरांगे हे ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर,नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहे. सोबतच 1 डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहे. विशेष म्हणजे आपल्या या दौऱ्यात प्रत्येक ठिकाणी मनोज जरांगे हे आरक्षणासाठी आत्महत्या करू नका असे आवाहन करणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!