Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : भाजपच्या चरणदासांनी केली महाराष्ट्राची, मराठी माणसाची बेअब्रू , संजय राऊत यांची मुख्यमंत्र्यांवर टीका …

Spread the love

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंब्र्यात आले. त्यांना आपल्या लोकांनी शाखेपर्यंत येऊच दिले नाही. त्यांचा बार फुसका निघाला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री नसाल तेव्हा तुमचा बार वरून उडेल का खालून उडेल ते बघा. ३१   डिसेंबरनंतर तुम्ही मुख्यमंत्रीपदी नसाल. मग तुम्ही कोणत्या बारमध्ये आहात ते कळेल. शिवसेनेचा बार गेल्या ५० वर्षापासून बाळासाहेब ठाकरेंपासून उडत आहे. भाजपने तुमचा बार कधीच उडवलाय. तो आधी बघा, असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. दिल्लीतील भाजपच्या चरणदासांनी महाराष्ट्राची, मराठी माणसाची बेअब्रू केली आहे. त्यांनी शिवसेनेला ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नये. मुंबईमध्ये आम्ही हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. पोलीस आले होते. आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही संयमाने घेतले. त्यामुळे नक्कीच संघर्ष टळला, असे संजय राऊत म्हणाले.

त्यांच्या अंतर्वस्त्रावर कमळ …

शिंदे आणि अजितदादा गटाचे नेते लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये जाणार आहेत. असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्याचे  त्यांनी समर्थन केले. लोकसभेपूर्वी कशाला ते आताच भाजपमध्ये आहेत. त्यांचे अंतर्वस्त्र पाहिले तर त्यावर कमळच आहे. त्यांच्या फुल पँटमध्ये खाकी हाफ चड्डी आहे. ती आताच घालायला सुरवात केली आहे. आतमध्ये कमळाची अंडरविअर आहे. तुम्ही कधी गेला तर त्यांना विचारा दाखवा काय आहे ते? त्याशिवाय ते मुख्यमंत्री पदावरती राहू शकत नाही. नंतर कशाला जायला हवे ते आताच गेले आहेत. आताच ते गुलाम झाले आहेत. गुलामाना स्वतःचे मत आणि स्वाभिमान नसतो, असा हल्ला त्यांनी चढवला.

नाही तर त्यांची औकात काय?

एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत. नाही तर त्यांची औकात काय? राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती बसवले गेले आहेत. शिवसेनेला तोडण्याचं भाजपचं जुनं स्वप्न आहे. मिंधे गटाला फोडूनही त्यांचं हे स्वप्न पूर्ण होत नाहीये. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून काही लोक तोडून शिंदे सरकार बनवले. जाऊ द्या. आता आमच्याच लोकांना आमनेसामने आणून मराठी लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम सुरू आहे. हे प्रत्येक राज्यात सुरू आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसते आणि दिवाळी नसती तर ती शाखा आम्ही ताब्यात घेतली असती, असं त्यांनी स्पष्ट केलं.

एकनाथ शिंदे यांची टोळी ही चोरांची गँग

एकनाथ शिंदे यांची टोळी ही चोरांची गँग आहे. दोघांमध्ये भांडण लावण्यावर भाजपची नेहमीच नजर असते. दोघांमध्ये भांडणं लावणं हाच भाजपचा विचार आहे. जात, धर्माच्या नावावर पार्टी तोडण्याचा भाजपचा विचार आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांवर भाजप भ्रष्टाचाराचे आरोप करत होती. आता हेच लोक भाजपचे प्रचारक आहे का? सत्ता, पैसा आणि उद्योग हाच भाजपचा विचार आहे. लोकांना गुलाम बनवणे हा भाजपचा विचार आहे, अशी टीका त्यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!