Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaAndolanNewsUpdate : धमकी समजा वा अजून काहीही समजा, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा …

Spread the love

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी अनेक बांधवानी आत्महत्या केल्या असून मी दिवाळी साजरी करणार नाही. समाजाच्या अपेक्षांवर नांगर फिरला असून त्यामुळं ते दिवाळी करतील असे वाटत नाही. सरकारला एकच विनंती आहे की, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या. मुख्यमंत्री, गृहमंत्री सगळ्यांना विनंती आहे कार्यवाही करा, अन्यथा पुन्हा म्हणू नका मराठे आले म्हणून, मग ही धमकी समजा वा अजून काही समजा, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तत्पूर्वी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याचे सांगितले आहे. मी कुटुंबियांसोबत बोललो नाही, कदाचित माझे  कुटुंबही दिवाळी करणार नाही. मराठा आरक्षणासाठी अनेकांनी आत्महत्या केल्या, त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटले  आहे. मात्र दोन दिवसांच्या आरामानंतर लागलीच महाराष्ट्र राज्याचा दौरा सुरु करणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे यावेळी म्हणाले की, आता व्यवस्थित वाटत आहे, म्हणून डिस्चार्ज मिळतो आहे. यानंतर लागलीच आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटुंबियांची भेट घेणार असून त्यानंतर 15 नोंव्हेबरपासून महाराष्ट्र दौरा करणार आहे. यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई असा दौरा असेल. 24 डिसेंबरपर्यत सर्व मराठा बांधवांना आरक्षण मिळणार असल्याचे सांगत सरकारवर दबावासाठी दौरा नाही, तर लोकांच्या भेटीगाठीसाठी असल्याचे स्पष्ट केले. सरकारकडून अनेक मराठा बांधवाना कुणबी प्रमाणपत्र मिळायला लागली आहेत. सरकारला एकच विनंती आहे की, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या. मुख्यमंत्री, गृहमंत्री, एसपी सगळ्यांना विनंती आहे, लवकरात लवकर कार्यवाही करा, नाहीतर पुन्हा म्हणू नका मराठे आले. ही धमकी समजा वा अजून काही समजा, पण सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांना सांगातोय की गोरगरीब मराठ्यांना अत्याचार करू नका, अन्यथा मराठा समाजाशी गाठ आहे, असा इशाराच मनोज जरांगे यांनी नेते मंत्र्यांना दिला आहे.

ईडब्ल्यूएसचे आरक्षण तुम्ही घ्या …

याचवेळी मनोज जरांगे यांनी मराठा समाजातील बांधवाना कळकळीचे आवाहन केले की, कुणीही आत्महत्या करू नका, आरक्षण आपल्याला मिळणार आहे. पायाला हाथ लावून सांगतोय, आत्महत्या करू नका. तसेच ओबीसी नेत्यांनी आता हट्टीपणा करू नये, वातावरण बिघडवू नये, राजकीय हट्ट सोडावा. ओबीसी नेत्यांकडून फार अपेक्षा नाही, ते आमच्याबाबत विचार करत नाही, असेही ते म्हणाले. तसेच ईडब्ल्यूएस म्हणजे जे वावर पिकत नाही ते आम्हाला देत आहेत, ते तुम्ही घ्या ना आणि इकडले आम्हाला द्या. या असल्या सल्ल्याना अर्थ नाही. दुसरीकडे गावबंदीचे पोस्टर काढले, म्हणून आमच्या पोरांना मारू नका, भोकरदनमध्ये दादागिरी सुरू असेल तर मराठे मोडून काढतील, ज्यांनी आमच्या पोरांना मारले त्यांच्यावर कारवाई करा, भोकरदन सहित सगळ्या नेत्यांना सांगतो, असा अप्रत्यक्ष इशारा भाजप नेते रावसाहेब दानवे यांना दिला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!