Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AccidentNewsUpdate : बीड जिल्ह्यातील दोन भीषण अपघातात १० ठार

Spread the love

बीड : बीड जिल्ह्यातील दोन अपघातात १० जण ठार झाले असल्याचे वृत्त आहे . यातील एका अपघातात मुंबईहून बीडच्या दिशेने येणाऱ्या सागर ट्रॅव्हल्सच्या बसला भीषण अपघात झाला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टा फाटा येथे हा अपघात झाला असून यात सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. जवळपास 45 ते 50 प्रवासी यातून प्रवास करत होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. पहाटेच्या सुमारास मुंबईहून बीडच्या दिशेने येत असताना अष्टा हरिनारायण येथे वळण घेताना हा अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की ट्रॅव्हल्सची बस 150 फूट घसरत गेली. अपघाताची माहिती मिळताच आमदार सुरेश धस यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मुंबई वरून बीडकडे निघालेली सागर ट्रॅव्हलची बस  ही बीड नगर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी तालुक्यातील आष्टा फाटा नजीक आज सकाळी सहाच्या दरम्यान उलटल्याने झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी वर आष्टी,जामखेड येथे उपचार सुरू असल्याचे बोलले जात असून आष्टी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दुसऱ्या अपघातात ४ ठार

दुसऱ्या एका अपघातात धामणगावकडून अहमदनगरकडे जात असलेल्या एका ट्रकला रुग्णवाहिकेने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघातबीड नगर राज्य महामार्गावरील दौलावडगाव नजीक बुधवारी रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडला. तर आज सकाळी सहा वाजता दुसऱ्या अपघातात आष्टी फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल उलटून सहा प्रवास्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

या विषयीची अधिक  माहिती अशी की , आष्टी तालुक्यातील अंभोरा हद्दीतील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ एक ट्रक ( क्र. MH 21 X 8600 ) हा धामणगाव कडून अहमदनगर दिशेने जात होता. रात्री साडे अकरा वाजेदरम्यान व्यंको कंपनीकडे डाव्या बाजूने वळण घेत असताना ट्रकला पाठीमागून आलेल्या रुगणवाहिकेने (क्र. MH 16 Q 9507 ) जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सिताराम लोखंडे, वय 35, रा. धामणगाव ता. आष्टी, मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरखुंडे, दोन्ही रा. जाट देवळा, ता. पाथर्डी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर डाॅ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के, वय 35, रा. सांगवी पाटण, ता. आष्टी यांचा मॅक केअर हाॅस्पीटल, अहमदनगर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर ज्ञानदेव सूर्यभान घुमरे, वय 45, रा. घाटा पिंपरी, ता. आष्टी हे गंभीर जखमी झाले असून  त्यांच्यावर मॅक केअर हाॅस्पीटल अहमदनगर येथे उपचार करण्यात येत आहेत.

दरम्यान या  अपघाताची माहिती मिळताच सपोनि. ढाकणे, पोउपनि. सातव, सफौ. रोकडे, केदार, शिरसाट, चालक  कांबळे यांनी घटनास्थळी पोहचून जखमींना अहमदनगर येथे दवाखान्यात रवाना केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!