Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : ठाकरे -शरद पवार यांच्या याचिकांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Spread the love

नवी दिल्ली : शिवसेना बंडखोर आमदार अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष विलंब लावत असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. तर राष्ट्रवादीच्या फुटलेल्या अजित पवार गटावर कारवाई करण्यासाठी शरद पवार गटानेही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही दोन्ही प्रकरणे वेगवेगळी असली तरी राज्यघटनेच्या १० व्या सुचीवर संबंधित असल्याने  सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही याचिकांवर एकत्रच सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये अजित पवार गटाच्या  ४१ आमदारांचे आणि शिवसेनेच्या ४० आमदारांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने एकत्र ऐकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत आमदार आपात्रतेवर ठाकरे गट आणि पवार गटाच्या याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात येणार असून यासाठी न्यायालयाने १३ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे.

या दोन्ही याचिकांवर एकत्र सुनावणी घेणार असल्याने विधानसभा अध्यक्षांना एकच निर्देश देण्यात येण्याची शक्यता आहे. अजित पवार आणि ९ मंत्री अशी पहिली याचिका होती, त्यानंतर अन्य आमदारांवरही कारवाईची याचिका आली आहे. त्यातच शिवसेनेची देखील याचिका प्रलंबित असल्याने सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही प्रकरणे एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान शरद पवार गटाने आपल्या याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घेण्याची मागणी केली होती. परंतु , दोन्ही याचिका एकत्र घेतल्याने दोन्ही प्रकरणांवरील निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!