Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CongressNewsUpdate : काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काय ठरले ? राहुल गांधी यांनी केले जाहीर …

Spread the love

नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) सोमवारी (9 सप्टेंबर) बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्यासह अनेक पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित होते.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले की, आम्ही CWC बैठकीत जात जनगणनेवर एकमताने सहमती दर्शवली. ते म्हणाले की राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशसह इतर काँग्रेस शासित राज्यांमध्ये जात जनगणनेसाठी आम्ही पुढे जाऊ. याबाबत भाजपवरही दबाव आणणार आहोत.

विरोधी आघाडी ‘इंडिया’मध्ये समाविष्ट असलेले बहुतांश पक्ष जातीच्या मोजणीच्या मागणीवर ठाम आहेत. किंबहुना बिहारमधील जात सर्वेक्षणानंतर ज्यांची  जितकी संख्या आहे त्यांना तितकी भागीदारी देण्याचा पक्षाचा मानोदय आहे.

पीएम मोदींचा उल्लेख केला

राहुल गांधी म्हणाले की, आमच्या चारपैकी तीन मुख्यमंत्री इतर मागासवर्गीय (ओबीसी)मधून आलेले आहेत. त्याच वेळी, भाजपच्या दहापैकी फक्त एक मुख्यमंत्री ओबीसी समाजातील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसींसाठी काम करत नसून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतात, असा दावा त्यांनी केला.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, जातीच्या जनगणनेमुळे भारतात किती आणि कोण लोक आहेत हे स्पष्ट होईल. तसेच कोणाच्या हातात पैसा आहे ते शोधून काढता येईल. विधानसभा निवडणुकीबाबत  राहुल गांधी म्हणाले की, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार येणार आहे. मध्य प्रदेशात भाजपचे सरकार जाणार आहे. तेलंगणातही भारत राष्ट्र समितीचे ( बी आर एस ) सरकार सत्तेवरून जाणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!