Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra police news update : धक्कादायक : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एपीआय आनंद माळाळे यांची डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या….

Spread the love
  • सोलापूर : नांदेड ग्रामीण पोलिसात बिलोली येथे कार्यरत असलेलेसहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद माळाळे यांनी कामाचा ताण आणि वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या रिव्हॉल्व्हरने डोक्यामध्ये गोळी झाडून घेऊन आयुष्य संपवले. ही धक्कादायक घटना आनंद माळाळे यांच्या घराच्या अंगणामध्ये पहाटे चारच्या सुमारास घडली.

या प्रकरणात त्यांच्या पत्नीने वरिष्ठांवर गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली परंतु वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि नातेवाईकांच्या मध्यस्तीनंतर रात्री त्यांच्या गावी उस्मानाबाद जिल्ह्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आनंद मळाळे हे नांदेड जिल्ह्यात बिलोली येथे कार्यरत होते. मात्र त्यांची तब्बेत बरी नसल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून आनंद माळाळे आजारी रजेवर सोलापूरात आपल्या घरी होते. मात्र त्यांनी शनिवारी पहाटे चारच्या सुमारास टोकाचे पाऊल उचलत स्वतःकडे असलेल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून त्यांनी स्वतःचे आयुष्य संपवले.

आनंद माळाळे यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांचा घरात शोध घेतला मात्र ते आढळून आले नाहीत. म्हणू त्यांनी घराबाहेर येत शोध घेतला तेव्हा मळाले मृतास्थेत पडले होते.
सहाय्य पोलीस निरीक्षक आनंद माळाळे यांनी आत्महत्या केल्याची माहिती समजताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजू मोरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

कुटुंबाला मानसिक धक्का

या घटनेनंतर पोलिसांनी सांगितले की, कामाचा ताण असल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद माळाळे यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

आनंद माळाळे हे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयमध्ये अनेक वर्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. खात्याअंतर्गत परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले. त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा आणि सदर बाजार या ठिकाणी सेवा बजावली आहे. त्यानंतर पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेड येथे त्यांची पदोन्नती झाली होती. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आनंद माळाळे यांनी आपले जीवन संपले असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

पत्नीचे गंभीर आरोप…

आनंद यांच्या पत्नी वंदना आनंद माळाळे यांनी नांदेड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्रास दिला म्हणून माझ्या पतीने टोकाचं पाऊल उचलले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पतीने व्हॉटसअॅपवर भावनिक मेसेज पाठवला होता.

  • “चिमू, पिल्लू मला माफ करा. मी तुमच्यासाठी काही एक भरीव योगदान दिले नाही. माझ्या पश्चात तुम्ही दोघे जीवाचे रान करुन चांगल्या भविष्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल. पिल्लूला माझे शुभ आशीर्वाद व त्याच्या उज्वल भविष्यासाठी लाख लाख शुभेच्छा. माझ्या पँटच्या डाव्या खिशात चिठ्ठी आहे”,

असा मेसेज आनंद  माळाळे यांनी पत्नीला पाठवला होता. हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

पत्नी वंदना माळाळे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले, माझ्या पतीला वरिष्ठांकडून खूप त्रास दिला जात होता. गुन्ह्याच्या तपासाकामी वरिष्ठ पोलीस अधिकारी दबाव आणत होते,असा गंभीर आरोप मृत एपीआयच्या पत्नीने केला आहे. त्यांनी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

या घटनेच्या धक्क्याने सोलापूर शासकीय रुग्णालयात पत्नी वंदना माळाळे ,मुलगा व  आईने हंबरडा फोडला आहे. त्यांचा टाहो पाहुन शासकीय रुग्णालयातील सर्वांचे डोळे पाणावले. आनंद माळाळे यांच्या मातोश्री रडून रडून बेशुद्ध पडल्या. त्यांनी आनंद माळाळे यांचे  संगोपन केले होते. जिवाचे रान करून पोराला मोठे केले . खूप हुशार मुलगा होता…असा कसा सोडून गेला..तुला टेन्शन होत तर मला सांगायचं होत…, अशा शब्दांत आईच रडणं पाहून संपूर्ण शासकीय रुग्णालयात दुःखाचे सावट पसरले होते. पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांचे ते नातेवाईक होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!