Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Chandrababu Naidu Arrest Updates : चंद्राबाबूंच्या अटकेच्या निषेधार्थ आज आंध्र प्रदेश बंदची हाक

Spread the love

हैद्राबाद : तेलगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू सध्या आंध्रप्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहेत. सध्या त्यांची रवानगी राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. चंद्राबाबूंच्या अटकेपासूनच टीडीपी आक्रमक झाला असून अटकेच्या निषेधार्थ आज संपूर्ण राज्यात बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी (9 सप्टेंबर) सीआयडीनं नंदयाल येथून अटक केली होती. एका दिवसानंतर, चंद्राबाबू नायडू यांना रविवारी (10 सप्टेंबर) सकाळी विजयवाडा न्यायालयात हजर करण्यात आलं, तिथे त्यांना 23 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

टीडीपीचे प्रदेशाध्यक्ष अत्चन नायडू यांनी आंध्र प्रदेशात एक दिवसीय बंदची हाक दिली आहे. चंद्राबाबू नायडू यांची ‘बेकायदेशीर’ अटक, टीडीपी कार्यकर्त्यांवरील क्रूर हल्ले आणि मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या सूडाच्या राजकारणाच्या निषेधार्थ बंदची हाक देण्यात आली असल्याचं प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

दरम्यान लोकशाही वाचवण्यासाठी तेलुगू देसम पक्षाच्या नेत्यांनी कामगार आणि सर्वसामान्य जनतेला स्वेच्छेनं बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. चंद्राबाबू नायडू यांची अटक हा जगन मोहन रेड्डी यांच्या मानसिक स्वभावाचा ताजा पुरावा असल्याचं टीडीपी नेत्यानं म्हटलं आहे. जगन मोहन रेड्डी यांना जनता धडा शिकवेल, असंही ते म्हणाले आहेत.

10 सप्टेंबर हा लोकशाहीसाठी काळा दिवस

10 सप्टेंबर हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचं टीडीपी नेते डी. जनतेसाठी काम करणाऱ्या नेत्याला राजकीय कटाचा भाग म्हणून सरकारने तुरुंगात पाठवले. नरेंद्र कुमार यांनी कार्यकर्त्यांना हिंमत न हरण्याचं आवाहन करत युवा नेते नारा लोकेश यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कायदेशीर लढा सुरूच ठेवणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे.

सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ लुथरा आणि वकिलांचा एक गट आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नायडू यांचे प्रतिनिधित्व करत आहेत. नायडू यांना शनिवारी रात्री 3.40 वाजता वैद्यकीय चाचणीसाठी विजयवाडा येथील शासकीय सामान्य रुग्णालयात नेण्यात आलं. तत्पूर्वी, कुंचनपल्ली येथील सीआयडीच्या विशेष तपास पथकाच्या (SIT) कार्यालयात त्यांची सुमारे 10 तास चौकशी करण्यात आली. सीआयडीनं आंध्रप्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांना 9 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता अटक केली होती. सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या त्यांच्या बसमध्ये झोपलेले असताना नायडू यांना अटक करण्यात आली.

प्रकरण काय आहे ?

कौशल विकास घोटाळ्यात चंद्राबाबू नायडू यांना आरोपी 1 म्हणून नाव देण्यात आलं आहे, ज्यात 300 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पोलीस अधिकार्‍यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या वकिलांना कौशल विकास प्रकरणात आंध्रप्रदेश उच्च न्यायालयानं जारी केलेल्या एफआयआर प्रत आणि इतर आदेशांची माहिती दिली आहे. दरम्यान, चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या वकिलांनी त्यांच्या नावाचा एफआयआर अहवालात उल्लेख नसल्याचं सांगत तपास अधिकार्‍यांना प्रथमदर्शनी पुरावे देण्याची विनंती केली आहे.

नायडू यांच्या अटकेनंतर, TDP नेत्यांनी चित्तूर जिल्ह्यातील कुप्पम विधानसभा मतदारसंघात निषेध केला. नायडू यांच्याशी एकजूट दाखवण्यासाठी त्यांनी उपोषणही केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी टीडीपीचे झेंडे घेऊन रॅली काढली, रस्ते अडवले आणि उपोषणाला बसले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!