Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RSSNewsUpdate : आरक्षणावर संघ प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केले आपले मत

Spread the love

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी बुधवारी आरक्षणाबाबत बोलताना , जोपर्यंत समाजात भेदभाव आहे तोपर्यंत आरक्षण कायम राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत नागपुरात म्हणाले की, “आम्ही समाजव्यवस्थेत आमच्या बांधवांना मागे सोडले आहे. आम्ही त्यांची काळजी घेतली नाही आणि हे २००० वर्षे चालू राहिले. जोपर्यंत आपण त्यांना समानता देत नाही तोपर्यंत त्यांना काही विशेष वागणूक द्यावी लागेल आणि आरक्षण हे त्यापैकीच एक आहे. त्यामुळे तोपर्यंत आरक्षण सुरू ठेवावे. ते पुढे कार्यक्रमात आपल्या भाषणात म्हणाले की, जोपर्यंत असा भेदभाव चालू राहील. आम्ही संघवाले म्हणजेच आरएसएस संविधानात दिलेल्या आरक्षणाला पूर्ण पाठिंबा देतो. भेदभाव दिसत नसला तरी समाजात तो प्रचलित आहे.

काय म्हणाले मोहन भागवत?

आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, हे केवळ आर्थिक किंवा राजकीय समानता सुनिश्चित करण्यासाठी नाही तर सन्मान देण्यासाठी देखील आहे. ते म्हणाले की भेदभावाचा सामना करणार्‍या समाजातील काही घटकांना २००० वर्षे समस्यांचा सामना करावा लागला आहे, तर मग आम्ही (ज्यांनी भेदभावाचा सामना केला नाही) आणखी २०० वर्षे काही समस्यांना तोंड का देऊ शकत नाही?

वास्तविक, घटनेनुसार, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांना जातीच्या आधारावर भेदभावामुळे आरक्षण मिळते. मंडल आयोगाच्या शिफारशींनंतर इतर मागासवर्गीयांनाही (ओबीसी) आरक्षण मिळत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!