काँग्रेस सत्तेत असताना कटोरा घेऊन भीक मागत होते पण आज जगभर देशाचे नाव सन्मानाने घेतले जाते : प्रफुल्ल पटेल

नागपूर : देशाचं नाव आज जगभर सन्माने घेतले जात आहे. काँग्रेस सत्तेत असताना कटोरा घेऊन भीक मागत होते. मी सुद्धा कॅबिनेट मंत्री होतो. त्यावेळी परिस्थिती पहिली. पण आज परिस्थिती बदली आहे. परदेशात आपल्या देशाचा बहुमान वाढला आहे. केवळ सत्तेत आलो म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करत नाही. हे जनतेनेही मान्य केले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हणाले की , काही लोक भाजप विरोधात भ्रम पसरवत आहेत. कुठलीच गडबड नाही. पुढली निवडणूक कोण जिंकणार असा प्रश्न विचारला जातो तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच नाव येते, असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीदी पक्षाबद्दल ते म्हणाले की , मी जबाबदरीने सांगतो, निवडणूक आयोगात 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम मुद्दत आहे, त्यानंतर सुनावणी होईल. येत्या 15 -20 दिवसात निकाल लागून, आमच्या बाजूने निकाल लागेल. कारण 43 आमदारानी आम्हाला पाठिंबा दिला आहे. सर्वाधिक लोक अजितदादांना पाठिंबा देत असल्यानं आपल्याला चिन्ह मिळेल हा विश्वास आहे.
पक्षाच चिन्ह आम्हालाच मिळणार आहे. आम्ही घेतलेली भूमिका स्पष्ट आहे. आम्ही एनडीएचे घटक म्हणून काम करणार आहोत. आमच्या तिन्ही पक्षात समन्वय आहे. काही बातम्या येतात की समन्वय नाही. पण आमच्यात पूर्णपणे समन्वय आहे. तीन पक्ष एकत्रित येतात तेव्हा काही गोष्टींवर अडचणी येतात. मात्र त्यावर तोडगा काढला जातो. सत्तेत योग्य हिस्सा मिळेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. मंत्रिमंडळ विस्तार किंवा पालकमंत्री पद यावर सुद्धा चर्चा सुरू आहे. ज्यांना विरोध करायचा ते करतात. काही आमदार कमजोर आहेत, असं दाखविण्याचा विरोधक प्रयत्न करतात. मात्र आमचे सगळे आमदार ताकतवर आहेत असेही त्यांनी सांगितलं.