Live Mahanayak news | केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live Mahanayak news | केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी.
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
Saturday | 05.August.2023
Live Mahanayak News Headlines 5th August :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार गटाची आज दुपारी एक वाजता, मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर इथे बैठक होणार आहे. शरद पवार यांचा दौरा १५ ऑगस्टनंतर सुरु होणारा असल्याने, जर पक्ष चिन्ह गेलं तर ते कोणतं असावं व प्रतिज्ञापत्र भरण्याची सद्यपरिस्थिती या विषयावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे.
शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन सुरक्षा जवान शहीद झाले. कुलगाम जिल्ह्यातील हलान जंगल परिसरात अतिरेकी असल्याच्या माहितीवरून लष्कराने शोध मोहीम सुरू केली होती, ज्यामध्ये कुलगाम पोलिसांचाही सहभाग होता.
मुंबईच्या एन.एम जोशी पोलीस ठाण्यात एका अभिनेत्रीने टांझानियाचा रहिवासी असलेल्या विरेन पटेल नामक व्यक्तीवर बलात्कार आणि जबर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार आणि मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला शुक्रवारी (4 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, कनिष्ठ न्यायालयाने जास्तीत जास्त शिक्षा देण्याचे कारण दिले नाही.
२०१९ मध्ये गुजरातच्या एका न्यायालयाने राहुल गांधींना मोदी आडनावावर टिप्पणी केल्याबद्दल २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती, त्यानंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्वही गमावले.
Live Mahanayak news
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055