SambhajiBhideNewsUdate : संभाजी भिडे यांना अटक करा अन्यथा मी जनतेच्या वतीने त्यांचा खून करतो , माजी मंत्र्यांचे फडणवीसांना पत्र …

बुलढाणा : महापुरुषांविषयी निंदाजनक वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या विरोधात राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातही संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरुन सत्ताधारी-विरोधकांत चांगलीच जुंपली. या पार्श्वभूमीवर आता एका माजी मंत्र्यांनी संभाजी भिडे यांचा खून करण्याची उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे दिली आहे.
माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी संभाजी भिडे यांना ही धमकी दिली आहे. ‘भिडे गुरुजींना अटक करा, अन्यथा मी त्यांचा मर्डर करेल”, अशी धमकी सावजी यांनी दिली आहे. सुबोध सावजी यांनी गृहमंत्र्यांना एक निवेदन देऊन भिडेंवर कारवाई करावी, अशी मागणी केली.
सुबोध सावजी नेमकं काय म्हणाले?
आपल्या पत्रात सावजी यांनी म्हटले आहे की , संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा, अन्यथा राज्यातील जनतेच्या वतीने त्यांचा मी मर्डर करेन आणि याची संपूर्ण जाबाबदारी आपल्यावर असेल, अशी धमकी बुलढाणा येथील माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी दिली आहे. तसे एक पत्रच सावजी यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवले आहे. ‘संभाजी भिडे हे सापडलेले बेवारस अर्भक आहेत. त्यांनी महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, असे सावजी यांनी म्हटले आहे.