IndiaNewsUpdate : बुद्ध विहार तोडून मंदिरे , ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणा बरोबर हिंदू मंदिरांचीही चौकशी व्हावी, स्वामी प्रसाद मौर्य यांची मागणी

लखनौ : ज्ञानवापी मशिदीच्या एएसआय सर्वेक्षणाबाबत आता सपा नेत्याने पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे. जर सर्वेक्षण करायचे असेल तर केवळ ज्ञानवापींचेच का, देशातील सर्व हिंदू मंदिरांचीही चौकशी झाली पाहिजे. देशातील बहुतांश हिंदू मंदिरे बौद्ध विहार पाडून बांधण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. स्वामी प्रसाद मौर्य यांनी बद्रीनाथ धामबाबतही असाच दावा केला आहे.
सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे की, “एएसआय सर्वेक्षण करणार असेल तर ते केवळ ज्ञानवापीचेच नाही तर सर्व हिंदू धार्मिक स्थळांचीही आधी चौकशी झाली पाहिजे, कारण बहुतेक हिंदू धार्मिक स्थळे पूर्वी बौद्ध मठ होती, ती पाडून हिंदू तीर्थस्थळे बनवली गेली आहेत. मुळात परस्पर सामंजस्य टिकून राहावे यासाठी १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत अस्तित्वात असलेल्या परिस्थितीचाच विचार केला पाहिजे. पण या नियमाचे पालन केले जात नसल्याने सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण होत आहे.”
‘बौद्ध विहार पाडून हिंदू मंदिरे बांधली’
त्यांनी असा दावा केला की “बद्रीनाथ धाम हे ८ व्या शतकापर्यंत बुद्धा विहार होते. आदि शंकराचार्यांनी त्याला हिंदू मंदिर बनवले. अशा स्थितीत एकासाठी काम केले तर मग सर्वांसाठीच काम करावे लागेल. आम्हाला मृतांना पुन्हा उकरण्याची इछा नाही. माझा हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन बौद्ध बंधुत्वावर विश्वास आहे. आमचा बंधुभावावर विश्वास आहे. समाजात फूट पाडण्यापेक्षा समाजात फूट पडू नये यावर आमचा विश्वास आहे.”
वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद परिसराच्या एएसआय सर्वेक्षणाचे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात आहे. आजही या प्रकरणावर सुनावणी सुरू असून, हिंदू बाजूने ज्ञानवापीचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी केली जात आहे, तर मुस्लिम बाजूने यावर बंदी घालण्याचे आवाहन केले आहे.