WB NewsUpdate : पंचायत निवडणूक निकाल 2023 : पश्चिम बंगालमध्ये ममता दिदीच “दादा “….

टीएमसीचा लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा : अभिषेक बॅनर्जीं
कोलकाता : पश्चिम बंगालमधील पंचयतीच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस (TMC) ने मोठा विजय मिळवला आहे. या विजयानंतर अभिषेक बॅनर्जींनी भाजपवर निशाणा साधताना, ‘लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा’ झाल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी ग्रामीण पश्चिम बंगालमधील लोकांचे त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीत त्यांच्या पक्षाला मतदान केल्याबद्दल आभार मानले.
भाजप आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यावर निशाणा साधत बॅनर्जी म्हणाले की , “ममता यांना मत देऊ नका’ या मोहिमेचे रूपांतर आता ‘ममता यांना मत द्या’मध्ये झाले आहे. यासाठी मी जनतेचा आभारी आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून आम्हाला नक्कीच मोठा जनादेश मिळेल.
संध्याकाळी ७ .३० वाजेपर्यंतच्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, टीएमसीने ११८ पंचायत समितीच्या जागा जिंकल्या आहेत, तर ७८२ जागांवर आघाडीवर आहेत. भाजप ७९ जागांवर आघाडीवर आहे. सीपीआय(एम) एक जागा जिंकली आहे. काँग्रेस ८ जागांवर आघाडीवर आहे. आणि इतर २७ जागांवर आघाडीवर आहे.
दरम्यान ग्राम समितीच्या ९ हजार ७२८ जागांसाठी निवडणूक झाली. TMC ने आतापर्यंत घोषित केलेले सर्व १८ जिल्हा परिषद निकाल जिंकले आहेत आणि इतर ६४ मध्ये आघाडीवर आहे, तर CPI(M) ने दोन जागा जिंकल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या एकूण ९२८ जागा आहेत.
८ जुलै रोजी राज्यात पंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. मतदानाच्या दिवशी राज्यभरात अनेक हिंसक घटना घडल्या. यामध्ये अनेकांचा मृत्यू, अनेक जण जखमी आणि मतदान केंद्रांवर तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर निवडणूक आयोगाने १० जुलै रोजी पुन्हा एकदा ६९६ बूथवर फेरमतदान जाहीर केले. आदल्या दिवशी राज्यात फेरमतदान घेण्यात आले. मात्र, यावेळीही हिंसक घटना समोर आल्या होत्या.
दरम्यानच्या काळात घडलेल्या हिंसाचाराच्या घटना लक्षात घेता पुनर्मतदानाच्या दिवशी सर्व मतमोजणी केंद्रांवर मोठा केंद्रीय फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सीसीटीव्ही कॅमेर्यांवर नजर ठेवण्यात येत असून राज्यात मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे.