NCPNewsUpdate : कोणाच्या मागे वास्तवात किती आमदार ? शरद पवारांची उद्या दिल्लीत बैठक ..

मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर आता उद्या दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. दरम्यान अजीत पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीत फूट पडली असताना आता कोणाला पाठिंबा देणार असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
या संकटकाळात अजित पवारांच्या पाठीशी कोण उभे राहणार आणि पक्षाचे संस्थापक शरद पवार यांना कोण साथ देणार ? असा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे आमदारांसामोर मोठा पेच निर्माण झळ आहे . या राजकीय युद्धात काही नेत्यांनी उघडपणे शरद पवारांना पाठिंबा दर्शवला आहे तर अजित पवारांचा गट त्यांना ४२ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करत आहे.
आजच्या दोन्हीही गटाच्या बैठकीत उपस्थित असलेल्या आमदारांची संख्या लक्षात घेता , महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादीचे ५३ आमदार आहेत. सध्या ३१ आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत, तर १८ आमदार शरद पवार यांच्यासोबत आहेत, त्यात त्यांचा नातू रोहित पवार यांचा समावेश आहे. उर्वरित तीन आमदारांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. बहुधा ते एक-दोन दिवसांत ठरवतील की त्यांना कोणत्या गटाशी उभे करायचे आहे. ज्या आमदारांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही त्यात देवळालीचे आमदार सरोज अहिरे, अणुशक्तीनगरचे नवाब मलिक आणि कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचा समावेश आहे. तर ५३ वे आमदार नवाब मलिक तुरुंगात आहेत.
दरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर दावा सांगितल्यापासूनच पक्षात खळबळ उडाली आहे. दरम्यान, सुप्रिया सुळेंपासून ते अजित पवारांपर्यंत सर्वांनी कार्यकर्त्यांना संबोधित करून ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जिथे सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी सर्व काही सहन करेन पण वडिलांचा अपमान सहन करणार नाही. त्याचवेळी शरद पवार म्हणतात की अजित पवारांना काही अडचण असती तर त्यांनी माझ्याशी येऊन बोलले असते. अजित पवार यांच्या मनात काही असेल तर त्यांनी थेट माझ्याकडे यायला हवे होते.