MaharashtraPoliticalNewsUpdate : शिंदे – फडणवीस मंत्री मंडळ विस्तार ,संभाव्य चार मंत्री कोण आहेत ?

मुंबई :, शिंदे-भाजप सरकारचा जुलैच्या पहिल्या आठवड्यात विस्तार होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना दिली. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रात दोन मंत्रीपदं दिली जाणार आहेत. त्यामोबदल्यात कोणत्या दोन जणांची मंत्रिपदं जाणार? यावर चर्चा चालू आहे दरम्यान . राज्यात नव्या चार जणांना संधी देताना शिंदे गटाच्या विद्यमान चार मंत्र्यांना मात्र डच्चू दिला जाणार, असल्याचं वृत्त आहे .
सूत्रांच्या माहितीनुसार कृषीमंत्री अब्दुल सत्तार, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत या चार जणांच्या मंत्रीपदावर टांगती तलवार आहे. कारण भ्रष्टाचारासह इतर वेगवेगळ्या कारणांनी या मंत्र्यांकडचे खाते वादात सापडले आहेत.
‘या’ नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता
दरम्यान या चार मंत्र्यांऐवजी शिंदेंच्या शिवसेनेतून भरत गोगावले, संजय शिरसाट, अनिल बाबर आणि मित्रपक्षातून बच्चू कडू यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे .शिंदेंकडे मुख्यमंत्रीपदासह सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती-जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, पणन, सामाजिक न्याय, मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन, अशी दहा खाती आहेत. तर फडणवीसांकडे गृह, अर्थ, विधी व न्याय, जलसंपदा, गृहनिर्माण, उर्जा आणि राजशिष्टाचार अशी 7 खाती आहेत. भरत गोगावलेंनी याआधीच आपले मंत्रिपद पक्के असल्याचा दावा केला आहे. आमदार संतोष बांगर यांनाही मंत्रिपदाची आशा आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सुद्धा त्यांच्या पक्षासाठी मंत्रीपद मागितले आहे आमदार नरेंद्र बोडेंकरांच्या समर्थकांनीही भावी मंत्री म्हणून बॅनर झळकावले आहेत.