AccidentNewsUpdate : मारुती सियाज व क्रूझर यांच्यात समोरासमोर धडक, ४ ठार ,९ गंभीर जखमी

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील वणी-सापुतारा महामार्गावर खोरी फाट्या जवळ मारुती सियाज व क्रूझर यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने मारुती सियाज कारमधील चार जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत
हा अपघात इतका भीषण होता की यात वाहनाचा चुराडा झाला आहे.अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत जखमींना गाडी बाहेर काढले. या अपघातातील मृतांमध्ये विनायक गोविंद क्षिरसागर (वय 37), योगेश दिलीप वाघ (वय 18), जतिन अनिल फावडे (वय 23, मोठा कोळीवाडा,वणी), रविंद्र मोतीचंद चव्हाण (वय 22) अशी यांचा समावेश आहे, तर जखमींमध्ये कमळी युवराज गांगोडे (वय 40), कल्पना सुभाष सोळसे (वय 19), तुळशीराम गोविंदा भोये (वय 28), ललीता युवराज कडाळे (वय 30), रोहिदास पांडुरंग कडाळे (वय 25), योगेश मधुकर सोळसे (वय 15), सुभाष काशिनाथ सोळसे (वय 15), देवेंद्र सुभाष सोळसे (वय 47), नेहल सुभाष सोळसे (वय 7) यांचा समावेश आहे. या सर्वांना वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना 108 रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आज अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी गावाजवळ भाविकांच्या क्रुझरला हा अपघात घडला. टँकर आणि क्रूझरमध्ये झालेल्या अपघातात 6 जण जागीच ठार झाल्याची माहिती. सर्वजण कर्नाटकमधील असून देवदर्शन करून येताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. क्रुझरमधील 6 ते 7 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. कर्नाटकातील अणूर ता. आळंद गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे.या अपघाताचे वृत्त ताजे असताना हा अपघात घडला.