मणिपूरला भेट देण्यास आलेला राहुल गांधींचा ताफा पोलिसांनी रोखला…

हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देण्यासाठी आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना स्थानिक पोलिसांनी पुढे जाण्यापासून रोखले. राहुल गांधी यांना इंफाळ विमानतळासमोरील विष्णुपूर चेकपोस्टवर सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी राहुल गांधींचा ताफा थांबवला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज इंफाळला पोहोचले. राहुल गांधी दोन दिवस हिंसाचारग्रस्त राज्याचा दौरा करणार होते आणि त्यांच्या दौऱ्यात ते मदत शिबिरांनाही भेट देणार असल्याचे वृत्त आहे. यासोबतच त्यांचा इंफाळ आणि चुरचंदपूर येथील नागरी समाजाच्या प्रतिनिधींना भेटण्याचा कार्यक्रम होता. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधींचा ताफा थांबवण्यात आला आहे.
राहुल गांधींच्या दौऱ्याची माहिती देताना काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर लिहिले होते, ‘तुमचे राहुल गांधी प्रेम, बंधुता आणि शांतीचा संदेश घेऊन मणिपूरला पोहोचले आहेत. काही वेळात ते हिंसाचार पीडितांना भेटेल.’ असेही त्यांनी लिहिले होते.
Congress leader Rahul Gandhi is going back to the airport in Imphal from Bishnupur, from there he will go to the pre-fixed program by helicopter.
— ANI (@ANI) June 29, 2023
BJPNewsUpdate : २०२४ च्या लोकसभेसाठी भाजपचा मेगा प्लॅन
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055