मुंबईत धक्कादायक प्रकार, अंत्यसंस्काराला न गेल्याने माय-लेकीवर जीवघेणा हल्ला… मुलीचा मृत्यू, आई गंभीर जखमी

मुंबईत विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. शेजारी राहत असलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला गेले नाहीत म्हणून माय-लेकीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला असून तीची आई गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जोडप्यांना मंगळवारी अटक केली आहे.
देवनार पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार अंजली भोसले यांनी सणीतले की कृष्णा पवार या व्यक्तीचा भाऊ घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडला राहतो, त्याचा मंगळवारी मृत्यू झाला त्याच दिवशी त्याच्यावर अंत्यसंस्कारही पार पडले. तक्रारदार भोसले यांचे कुटुंब मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शेजारीच राहतात, पण ते मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला गेले नाहीत. याचा राग मनात धरुन कृष्णा पवार याने अंजली भोसले यांच्या आईवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यावेळी अंजली यांच्या बहिणीने आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण चिडलेल्या कृष्णाने तिला धारदार चाकूने अनेकदा भोसकले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला तर तिची आई यामध्ये गंभीर जखमी झाली आहे.
या तक्रारीनुसार, पोलिसांनी कृष्णा पवारला अटक केली असून त्याची बायको आणि दुसऱ्या एका दाम्पत्याला देखील ताब्यात घेतले आहे, कारण त्यांचाही या हल्ल्यामध्ये सहभाग होता. एकूण चार जणांविरोधात पोलिसांनी भादंवि कलम ३०२ नुसार हत्येचा आणि कलम ३०७ नुसार जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधीक तपास सुरु आहे.
जगन्नाथ रथ यात्रेत मोठी दुर्घटना ६ जणांचा मृत्यू १५ पेक्षा अधिक लोक जखमी
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055