जगन्नाथ रथ यात्रेत मोठी दुर्घटना ६ जणांचा मृत्यू १५ पेक्षा अधिक लोक जखमी

जगन्नाथ रथ यात्रेत मोठी दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. त्रिपुरातील कुमारघाट येथे भगवान जगन्नाथ रथ यात्रेदरम्यान वीजेच्या धक्क्याने ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ पेक्षा अधिक लोक या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. या घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली.
जगन्नाथ रथ यात्रेदरम्यान मिरवणूक सुरु असताना रथ एका उच्च दाबाच्या वीज तारेच्या संपर्कात आला. यामुळे करंट पसरला आणि त्याच्या धक्क्याने ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर पंधराहून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी अग्निशमन दलासही घटनास्थळी धाव घेतली. हा रथ १३३ केव्ही ओव्हरहेड केबलच्या संपर्कात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
त्रिपुरातील उनाकोटी जिल्ह्यातील कुमारघाट येथे भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांची रथ यात्रा मोठ्या उत्सहाता काढण्यात आली होती. त्यादरम्यान, काल बुधवारी साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. यावेळी लोखंडाने बनलेला हा रथ हजोर भाविक आपल्या हाताने खेचत होते. याचदरम्यान, लोखंडाचा हा रथ रस्त्यातील हाय टेन्शन वायरच्या संपर्कात आला. यामुळे वीज रथात उतरली आणि अनेक जणांना वीजेचा धक्का बसला. यात ६ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मणिपूरला भेट देण्यास आलेला राहुल गांधींचा ताफा पोलिसांनी रोखला…
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055