CrimeNewsUpdate : भयानाक : पतीने पत्नीच्या प्रियकराची हत्या करून रक्त केले प्राशन …

बंगळुरू : कर्नाटकात एक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आधी पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला आणि नंतर त्याचे रक्त प्राशन केले. आपल्या पत्नीचे आपल्या मित्रासोबत अफेअर असल्याचा संशय या व्यक्तीला होता, त्यानंतर त्याने अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्राचा गळा चिरून खून केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली.
विशेष म्हणजे त्या व्यक्तीने त्याच्या मित्राला संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवण्यास सांगितले. या संपूर्ण प्रकरणानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मात्र पतीच्या हल्ल्यातून पीडिता वाचली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हे संपूर्ण प्रकरण कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथील आहे. ही संपूर्ण घटना त्या व्यक्तीच्या आणखी एका मित्राने कॅमेऱ्यात कैद केल्याने हे प्रकरण उघडकीस आले. विजय असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. विजयला संशय होता की त्याचा मित्र मारेश याचे त्याच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. यानंतर विजयने त्याचा मित्र मारेशला भेटण्यास सांगितले. यानंतर रागाच्या भरात विजयने धारदार शस्त्राने मारेशचा गळा चिरला. विजयचा दुसरा मित्र जॉन याने हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये बनवला. व्हिडिओमध्ये विजय रक्त पिताना दिसत आहे.
या भीषण घटनेनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.