Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : शिंदे-फडणवीसांकडून मंत्रिमंडळ विस्तार आणि महाराष्ट्र दौऱ्याचे नियोजन…

Spread the love

मुंबई : शिसेनेतून बंडखोरी करीत ५० आमदारांना सोबत घेऊन शिंदे आणि फडणवीस यांनी सरकार बनवले असले तरी नव्या सरकारसोबत आलेल्या बहुतेक आमदारांना मंत्रिपदाची सहा असल्याने त्यांना एकत्र ठेवणे शिंदे फडणवीस सरकारसमोर मोठी डोकेदुखी झली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान राज्य राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचेही वृत्त आहे. त्याचबरोबर शिंदे -फडणवीस यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याचीही तयारी सुरु केली आहे.


मंत्रिमंडळाच्या समावेशावरून अनेक आमदार नाराज असताना आ. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वाक्युद्धा सुरु झाल्यामुळे या वादावर बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावे असे म्हटले आहे. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर त्यांनी पैसे घेऊन सरकारला पाठिंबा दिल्याचा गंभीर आरोप केल्यामुळे बच्चू कडू रवी राणा यांच्यावर आरोप सिद्ध करण्याचे आव्हान कडू यांनी दिले आहे. यासाठी त्यांनी १ नोव्हेंबरच अल्टिमेटम दिला आहे.

एकीकडे आमदारांचे आरोप प्रत्यारोप करण्याचे आणि नाराजीचे वातारण असताना दुसरीकडे राज्यातील पिकांच्या नुकसानीवरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरले आहे हि टीका लक्षात घेऊन  शिंदे-फडणवीसांनी एकत्रित दौरा आयोजित केला आहे. याच मुद्द्यावरून औरंगाबादच्या दौऱ्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे . त्यामुळे या दौऱ्यापूर्वीच  शिंदे-फडणवीसांच्या दौऱ्याला सुरूवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारपासून नंदुरबार मधून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आणि १० अपक्ष असे एकूण ५० आमदार सोबत घेत महाविकास अघडविरुद्ध बंड केले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते.  आपल्याच पक्षातील लोकांनी बंडखोरी केल्याच्या धक्क्यातून सावरत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे  येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये मुंबईसह राज्यातल्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका लागत आहेत. भाजपसह सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे दौरे महत्त्वाचे ठरणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!