IndiaNewsUpdate : धक्कादायक : कमाल झाली !! पती, पत्नीच्या आत्महत्येचा व्हिडीओ बनवत राहिला आणि तिचा जीव गेला ….

कानपुर : आपली पत्नी गळफास घेत असताना तिला आत्महत्येपासून परावृत्त करून तिला वाचवण्यापेक्षा तिचा आत्महत्येचा व्हिडीओ बनविण्याचा धक्कादायक आणि लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला आहे. कानपूरमधील गुलमोहर विहार नौबस्ता परिसरात हि घटना घडल्याचे उघडकीस आले आहे .
विशेष म्हणजे या नराधम पतीने हा व्हिडिओ पत्नीच्या माहेरच्या लोकांना पाठवण्याचे दुस्सा:हस केले. हा व्हिडिओ पाहून कानपूरमध्ये राहणाऱ्या या विवाहितेची पालक जेंव्हा तिच्या घरी पोहोचले तेंव्हा त्यांची मुलगी तेथे मुलगी बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेली होती. दरम्यान आई-वडिलांनी घाईघाईत मुलीला रुग्णालयात नेले मात्र तेथे तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान संतप्त आई वडिलांनी सासरच्या मंडळींनी तिचा हुंड्यासाठी छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.
या घटनेबाबत माहिती देताना कानपूरच्या किदवई नगर ई-ब्लॉकमधील रहिवासी राजकिशोर गुप्ता यांनी सांगितले की, “१८ फेब्रुवारी २०१७ रोजी मुलगी शोभिता हिचा विवाह हनुमंत विहार पोलीस स्टेशन परिसरातील गुलमोहर विहार येथील रहिवासी संजीव गुप्ता यांच्याशी झाला होता. लग्न झाल्यापासून पती आणि सासर हुंड्यासाठी त्रास देत होते. अत्याचार करत होते. २५ ऑक्टोबरला मुलीवर एवढा अत्याचार केला की तिने गळफास लावून घेतला. त्यावर काडी म्हणजे जावई संजीव याने तिचा आत्महत्या करतानाच व्हिडिओ बनवून आम्हाला पाठवला.”
त्याला वाटले पत्नी नाटक करीत आहे …
दरम्यान पोलिसांच्या चौकशीत आरोपी पती संजीवने सांगितले की, २५ ऑक्टोबर रोजी दोघांमध्ये भांडण झाले होते. यानंतर फाशी घेऊन म्हणत पंख्याला फास बांधू लागली, त्यामुळे मी तिचा व्हिडिओ काढून मी तिच्या माहेरी पाठवला. यादरम्यान तिने गळफास घेतला नाही आणि खाली उतरली. सासरच्या मंडळींना व्हिडीओ पाठवताना तो म्हणाला की, तुझ्या मुलीचे कृत्य बघा. यानंतर दोघांमध्ये भांडण झाले आणि पत्नीने पुन्हा गळफास लावून आत्महत्या केल्याचे संजीवचे म्हणणे आहे. पतीने विचार केला की, पत्नी धमकी देत आहे किंवा फाशीचे नाटक करत आहे आणि काही वेळात शोभिताचा मृत्यू झाला.