Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ElectionNewsUpdate : राज्यातील १८ जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान…

Spread the love

मुंबई : राज्यातील १८ जिल्ह्यामध्ये रविवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी  ग्रामपंचायत निवडणुकीचे  मतदान होणार आहे. मतदानानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सोमवारी मतमोजणी होईल. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून होणार आहे.


राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. १६ ग्रामपंचायतीची मतमोजणी १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

जिल्हा व तालुकानिहाय ग्रामपंचायतीची संख्या

ठाणे: कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, व शहापूर- 79.
पालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जवाहार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 व वाडा- 70 ( पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत 711 सदस्य बिनविरोध तर १० सरपंच बिनविरोध आलेत, तर जिल्ह्यात पाच ग्रामपंचायती बिनविरोध आहेत )
रायगड: अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1.
रत्नागिरी: मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 व राजापूर- 10.
सिंदुदुर्ग: दोडामार्ग- 2 व देवडगड- 2. नाशिक:
इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 व पेठ- 71.
नंदुरबार: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 व नवापूर- 81.
पुणे: मुळशी- 1 व मावळ- 1.
सातारा: जावळी- 5, पाटण- 5 व महाबळेश्वर- 6.
कोल्हापूर: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 व चंदगड- 1.
अमरावती: चिखलदरा- 1.
वाशीम: वाशीम- 1.
नागपूर: रामटेक- 3, भिवापूर- 6 व कुही- 8.
वर्धा: वर्धा- 2 व आर्वी- 7.
चंद्रपूर: भद्रवाती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 व ब्रह्मपुरी- 1.
भंडारा: तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 व साकोली- 1.
गोंदिया: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 व अर्जुनी मोर- 2.
गडचिरोली: चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 व गडचिरोली- 1.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!