DelhiNewsUpdate : बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञा ग्रहण करणारे दिल्लीचे मंत्री राजेंद्र पाल यांचा मंत्रिपदाचा राजीनामा ….

नवी दिल्ली : धार्मिक भावना भडकावल्याच्या आरोपांमुळे दिल्ली सरकारचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारीच एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान त्यांनी हिंदू धर्माबाबत वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर भाजपने केजरीवाल सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. या वादात भाजप राजेंद्र पाल गौतम यांच्यावर हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत आहे. मंत्र्यांच्या उपस्थितीत, हजारो लोक ‘राम-कृष्ण’ला देव मानणार नाहीत आणि त्याची कधीही पूजा करणार नाहीत, अशी शपथ घेत असल्याचा व्हिडिओही समोर आल्यानंतर गौतम बौद्ध आणि हिंदू यांना आपसात लढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून त्यांनी हिंदू समाजाची माफी मागावी, अशी मागणीही भाजपने केली होती. त्यांच्या या निर्णयाचे सोशल मीडियावरून स्वागत होत आहे.
दरम्यान हिंदू देवतांच्या कथित अपमानामुळे वादात सापडलेले अरविंद केजरीवाल सरकारचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी काही दिवसांपूर्वी या प्रकरणावर आपले स्पष्टीकरणही दिले होते. परंतु या वादाने व्यथित झालेले राजेंद्र गौतम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी आपल्या ट्विट्टरवर म्हटले आहे.
आज महर्षि वाल्मीकि जी का प्रकटोत्सव दिवस है एवं दूसरी ओर मान्यवर कांशीराम साहेब की पुण्यतिथि भी है। ऐसे संयोग में आज मैं कई बंधनों से मुक्त हुआ और आज मेरा नया जन्म हुआ है। अब मैं और अधिक मज़बूती से समाज पर होने वाले अत्याचारों व अधिकारों की लड़ाई को बिना किसी बंधन के जारी रखूँगा pic.twitter.com/buwnHYVgG8
— Rajendra Pal Gautam (@AdvRajendraPal) October 9, 2022
आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे कि , मी एक आंबेडकरवादी कार्यकर्ता आहे. मी ५ ऑक्टोबर रोजी धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला व्यक्तिगतरीत्या उपस्थित बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे पठाण केले मात्र भाजपच्या नेत्यांनी माझ्या या कार्यक्रमावरून आप या माझ्या पक्षाला आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बदनाम करणे सुरु केले आहे हि गोष्टझयासाठी दुःखद आहे. वास्तविक या २२ प्रतिज्ञा केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथात छापलेल्या आहेत तरीही भाजपकडून असे आरोप करण्यात येत आहेत. भाजपचे लोक यावरून राजकारण करीत आहेत. तर आप आणि अरविंद केजरीवाल बाबासाहेबांच्या मार्गावर चालत आहेत. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
मी बाबासाहेबांचा आणि बुद्धाचा अनुयायी आहे आणि या मार्गावर चालण्यासाठी वचनबद्ध आहे . माझ्या समाजावरील अन्याय , अत्याचाराच्या विरुद्ध लादण्यासाठी मी आयुष्यभर प्रयत्न करिन त्यासाठी मला मंत्रिपदाची गरज नाही. मला अनेक लोकांकडून धमक्या येत आहेत पण मी घाबरणारा नाही . आपल्या समाजाच्या भल्यासाठी मी कोणत्याही बलिदानाला तयार आहे. एकीकडे बाबासाहेबांच्या नावाने राजकारण करायचे आणि दुसरीकडे त्यांच्या विचारांना असा विरोध करायचा या भाजपच्या दुटप्पी राजकारणाला कंटाळून मी आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत.
आज महर्षी वाल्मिकीजींचा प्रकट दिन आहे आणि दुसरीकडे मन्यावर कांशीराम साहेबांची पुण्यतिथीही आहे. अशा योगायोगाने आज मी अनेक बंधनातून मुक्त झालो आणि आज माझा पुनर्जन्म झाला. आता मी कोणत्याही बंधनाशिवाय अधिक खंबीरपणे समाजावरील हक्क आणि अत्याचाराचा लढा सुरू ठेवणार आहे.