Nashik Bus Fire : बस – टँकरच्या भीषण अपघातात बस पेटली , १० जणांचा होरपळून मृत्यू …

नाशिक : नाशिक – औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. मिरची चौकात पहाटेच्या सुमारास खासगी बसला अचानक आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही बस यवतमाळहून मुंबईकडे निघाली होती.
पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचे पथक पोहोचले आणि त्यांनी बचाव कार्य केले. औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस व टँकर यांच्यात शनिवारी (दि.8) पहाटे सव्वा पाच वाजता हा भीषण अपघात झाला. बसमध्ये ४८ जण प्रवास करत होते. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही स्लीपर कोच बस होती. यवतमाळहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या या बसचा आणि धुळ्यावरून पुण्याच्या दिशेने जाणारा एक कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. यानंतर बसला आग लागली.
Maharashtra | Nashik Police confirms that several people are feared to be dead as a bus caught fire in Nashik last night. Further details awaited. pic.twitter.com/s75A6RnYHO
— ANI (@ANI) October 8, 2022
बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आले, त्यांनी उड्या मारल्या तर आगीमुळे प्रवासी जळून खाक झाले. सदर अपघातानंतर बस ५० ते ६० फूट पुढे घसरत गेली तर टँकर ७० ते ८०मीटर पुढे जाऊन थांबला टॅंकरने रस्त्याच्या कडेला थांबला. सदर अपघातात बसने पेट घेतल्याने जळून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बस मधून हलविण्यात आले.